शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

सिंदखेडराजातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार - राजेंद्र शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 19:51 IST

देऊळगांवराजा :  विरोधक वा अन्य कोणी अफवांचे पीक पसरवत असले तरीही मी राष्टÑवादी पक्षाचा निष्ठावंत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सिंदखेडराजा मतदार संघातूनच लढवणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देदेऊळगाव राजा येथे पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवराजा :  विरोधक वा अन्य कोणी अफवांचे पीक पसरवत असले तरीही मी राष्ट्रवादी पक्षाचा निष्ठावंत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सिंदखेडराजा मतदार संघातूनच लढवणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे स्पष्ट केले.रविवारी देऊळगांवराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आयोजित कार्यक्रमात डॉ. शिंगणे बोलत होते. कार्यक्रमाला गंगाधरराव जाधव, प्रा.दिलीप झोटे, गजानन पवार, सभापती नितीन शिंगणे, शांतीलालादादा सिंगलकर, तुकाराम खांडेभराड, कविश जिंतूरकर, कचरु सपाटे, विठ्ठल मग, नंदलाल शर्मा, बळीराम गोरे, अ‍ॅड.अर्पित मिनासे, प्रमोद वैराळकर, धनंजय मोहिते, राजु सिरसाट, बद्रीदास बैरागी, अशोक पाटील, नगरसेवक ईस्माईल बागवान, हनीफ शहा, विद्या अतिश कासारे, नवनाथ गोमधरे, गटनेता विष्णू रामाणे, अनिल रामाणे, बाळू शिंगणे, एल.एम.शिंगणे, संतोष पिंपळे, मुरलीधर कामळे, गुरुदेव भंडारी, विश्वजीत दहिवाळ, महेश देशमुख  आदींची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की २०१४ ची निवडणूक लढवण्याचा निर्णय माझाच होता. त्याही निवडणूकीत प्रामाणिकपणे मी व माझ्या सहकाया-यांनी निष्ठेने पक्षाचेच काम केले. गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मतदार संघाकडे व माझ्या कार्यकर्त्यांकडे मी दुर्लक्ष केले नाही. पालिका बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणूका मी गांभीर्याने घेतल्या. बाजार समिती, पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत आणून राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवली. जिल्हा परिषदेमध्येही राष्ट्रवादी पक्षाच्या वर्चस्वाला धक्का लागू दिला नाही. त्यामुळे सिंदखेडराजा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाची ताकद कायम असली तरी गाफील न राहता पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी पदाधिकाºयांनी मरगळ झटकून कामाला लागा. शहरातील संपूर्ण वार्ड व गावागावात पक्षप्रमुख व त्यांची कार्यकारिणी निवडून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातल्या लोकांपर्यत जाऊन त्यांनंतर पक्ष प्रवाहात आणण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.  दरम्यान, राजकारणाच्या सारीपाटावर गेल्या २३ वर्षापासून समाजकारण करत असताना सिंदखेडराजा मतदार संघातील अठरापगड जातीधर्माला सोबत ठेऊनच मी सातत्याने विकासाचे व बहुजनांच्या हितांचे कार्य केले. १९९५ पासून सलग चार वेळा मतदारांनी मला निवडून दिले, ते ऋण मी कधीच विसरु शकत नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके म्हणाले की, जातीपातीच्या राजकारणाला कधीही थारा न देता डॉ.शिंगणे यांनी राजकारण केले. त्यांच्याच काळात मतदारासंघात हरीतक्रांती झाली. आजचे सत्ताधारी न केलेल्या कामांचे श्रेय लाटत असून साडेतीन वर्ष झाली तरी विकासाची वाणवा आहे. जे सत्य आहे ते जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले. यावेळी शहरातील युवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. डॉ.शिंगणे यांच्या हस्ते शंकर शिवरकर, किशोर शिवरकर, अशोक शिवरकर, जानराव शिवरकर, सय्यद अन्सार, संजय काकडे, दिलीप आंधळे, शेख अतिक मोहम्मद जमील यांचा सत्कार करण्यात आला. संचलन शहर अध्यक्ष बद्रीदास बैरागी यांनी केले. 

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेSindkhed Rajaसिंदखेड राजाbuldhanaबुलडाणाElectionनिवडणूक