शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर; दोन पूल वाहून गेले, शेतीचेही झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:02 IST

Buldhana News : कोराडी नदीला पूर आल्यामुळे सवडद ते गजरखेड रस्त्यावरील पूल हा वाहून गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : परिसरात १५ जूनला पडलेल्या दमदार पावसामुळे सवडद आणि उमनगाव येथील दोन पुलांचे मोठे नुकसान झाले असून साखरखेर्डा मंडळामध्ये दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातच पावसामुळे साखरखेर्डा ते मेरा बुद्रुक रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे.साखरखेर्डा मंडळामध्ये बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७४ मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १ मिमी पावसामुळे तांत्रिकदृष्ट्या या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद होऊ शकली नाही. मात्र, या मंडळात पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.या पावसामुळे सवडद येथील कोराडी नदीला पूर आल्यामुळे सवडद ते गजरखेड रस्त्यावरील पूल हा वाहून गेला आहे. या पुलाची उंची कमी असून २००१ तो उभारण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून पुराच्या पाण्याचे धक्के बसलेल्याने या पुलाला आधीच तडे गेले होते. त्याच्या दुरुस्तीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. सरपंच शिवाजी लहाने यांनी मेहकर व देऊळगाव राजा विभागाशी त्यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. मात्र, दोन्ही विभागांनी हा पूल आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडे लक्ष वेधले होते. मात्र, आता पूलच मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा एकमेव मार्गच बंद झाला आहे. पंचायत समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनीही या पुलासाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.राताळी, शिंदी, सवडद, पिंपळगाव सोनारा, साखरखेर्डा, गुंज, वरोडी, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, बाळसमुद्र, शेंदुर्जन, तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेली सोयाबीनची पेरणी उलटण्याची भीती व्यक्त होत आहे.

उमनगावचाही संपर्क तुटला  उमनगावचाही यामुळे संपर्क तुटला आहे. गोरेगाव ते उमनगाव रस्त्यावरील पूल पावसाने क्षतिग्रस्त होऊन त्याचा काही भाग वाहून गेला आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे या नाल्यावरील पूल वाहून गेला होता. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुरूम टाकून कसाबसा तो वापरण्याजोगा केला होता. १५ दिवसांपूर्वी सरपंच प्रकाश भगत, माजी सरपंच मोहन गायकी, शांताराम गवई, पंजाबराव मोरेंसह ग्रामस्थांनी पुलाचे काम करण्याची मागणी जि. प. बांधकाम विभागाकडे केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. आता उमनगावमध्ये कोणतेच वाहन जाऊ शकत नसल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस