शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सलग २0 दिवसांपासून पावसाची दडी!

By admin | Updated: August 28, 2016 23:17 IST

मलकापूर तालुक्यात उत्पादनात घट येण्याची शक्यता.

मलकापूर(जि. बुलडाणा),दि. २८: गेल्या २0 दिवसापासून पावसाने उघाड दिल्याने शेतकर्‍यांना आ पल्या शेतातील निंदन, डवरे, किटकनाशक फवारणी यासारखी मशागतीची कामे करण्यास वेळ मिळाला. परंतु निंदन, डवरणी ही कामे पुर्ण ओल असताना केली. तसेच उन तापत असल्यामुळे जमिनीला भेगा पडत आहे. परिणामी पिकांच्या मुळावर परिणाम होत असून शेतातील पिकांची परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे येत्या २ दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर पिकांच्या उत्पन्नात घट होणार यात शंका नाही.यावर्षी मृग नक्षत्रात नगण्य पाऊस झाला. मात्र त्यानंतर आलेल्या आद्र्रा, पुनर्वसु, पुष्प, आश्लेषा या नक्षत्रात रिमझीम परंतु दमदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चकाकी आली होती. मृग नक्षत्रात ४ मिमी, आद्रा नक्षत्रात ८३ मिमी, पुनर्वसु नक्षत्रात २७५.0 मिमी व आश्लेषा नक्षत्रात ७६ मिमी पाऊस झाला आहे. १६ ऑगस्टपासून मघा नक्षत्रास सुरूवात झाली असून या नक्षत्रात आतापर्यंंंत ढगाळ वा तावरण दिसत असले तरी पाऊस झालाच नाही यावर्षी जुन महिन्यात ८७.0 मिमी, जुलै महिन्यात ३७0.0 मिमी तर ऑगस्टच्या १२ तारखेपर्यंंंत ६२.0 मिमी असा एकंदर ५२८.0 मिमी पाऊस झालेला आहे. जुन महिन्यात १२६.६ मिमी, जुलै महिन्यात १९९.५ मिमी तर ऑगस्ट महिन्यात १४९.५ मिमी असा एकंदर मिमी पाऊस होतो. गत महिन्यात सरासरी पेक्षा ३९.६ मिमी पाऊस झाला तर जुलै महिन्यात सरासरी पेक्षा १७९.५ मिमी जास्त पाऊस झाला. विशेष म्हणजे तिनही महिन्याची सरासरी ओलांडलेली आहे.हवामान खाते, ज्योतिष्यशास्त्र व भेंडवळ मांडणीने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असे भाकीत केले होते व त्यांच्या भाकीताप्रमाणे पाऊसही झाला. मात्र पावसाने सलग १३ दिवस उघाड दिल्याने शे तकर्‍यांच्या चेहर्‍यावरील चकाकी लोप पाऊन चेहर्‍यावर चिंतेचे सावट पसरले आहे. मघा नक्षत्राचे १0 दिवस कोरडे गेले असून ज्योतिष्य शास्त्रानुसार या नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पाऊस होईल, अशी अ पेक्षा व्यक्त केली आहे. परंतु तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होते व हवेमुळे हे ढग पुर्व दिशेकडे निघून जातात. त्यामुळे या नक्षत्राच्या शेवटच्या चरणाने दगा दिला तर पिकांच्या उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होईल. ३0 तारखेपासून पुर्वा नक्षत्रास सुरूवात होणार आहे. याच नक्षत्रात गणपती बाप्पांचे आगमन होते व त्यांचे आगमनानंतर सर्वत्र पाऊस हमखास हजेरी लावतो असा अनुभव शेतकर्‍यांना आहे. तर त्यानंतरच्या उत्तरा व हस्त नक्षत्रात सुध्दा पावसाचे योग दर्शविले आहे. पुर्वा, उत्तरा व हस्त नक्षत्रात जोमदार पाऊस झाला तर रब्बीच्या पेर्‍यात वाढ होईल. परंतु निसर्ग कोणता चमत्कार करतो हे येणारा काळच दर्शविणार आहे. पावसाने उघाड दिल्याने बाजारातील भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. सोब त बाजारातील चैतन्य हरविले असून बाजारात सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापारी सुध्दा हातावर हात धरून बसले असल्याचे दिसून येत आहे व जोपर्यंंंत पाऊस हजेरी लावत नाही. तो पर्यंंंत शेतकरी व व्यापार्‍यांचे चेहरे खुलणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्वच राज्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मात्र तालुक्यात झालेला पाऊस हा रिमझीम स्वरूपाचा होवून जमिनी त मुरले असल्याने कित्येक विहिरीच्या जलसाठय़ात वाढ झाली असली तरी पुढील नक्षत्रांनी शे तकर्‍यांना साथ दिली नाही तर शेतकर्‍यांसह श्रीगणेशांना सुध्दा त्याची झळ पोहचणार यात शंका नाही.