शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

पावसाची दडी...तुषार सिंचन सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

चिखली : जून महिना संपत आला असतानाही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या ...

चिखली : जून महिना संपत आला असतानाही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. काही भागांत पेरणी योग्य पाऊस झालेला असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्यात; मात्र, आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने नुकतेच अंकुरलेली पिके करपू लागली आहेत. पावसाने आणखी विलंब लावल्यास पेरणी झालेल्या ४२ टक्के क्षेत्रावरील पिकांचे ९० टक्के नुकसान अटळ असल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार संचाव्दारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू झाली आहे.

यामध्ये कोरडवाहू क्षेत्र उद्ध्वस्तीच्या मार्गावर असल्याने सर्वत्र चिंतेचे मळभ दाटून आले आहे. मृगात पेरणी केल्यानंतर पीक चांगले येते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानुषंगाने यंदा मान्सूनपूर्व पाऊस पडताच खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे व खत खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली होती. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सुमारे ४२ टक्के क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, आता पावसाने डोळे वटारल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. हंगामाच्या सुरुवातीला हमखास पाऊस येणारच असे भाकीत हवामान खात्याच्या व इतर मान्सूनविषयक अभ्यासकांमधून व्यक्त केल्या जात होती. मात्र, ही भाकिते फोल ठरली आहेत. या भाकितांमुळे अनेक शेतकऱ्यांनी गडबड करत सोयाबीनची पेरणी उरकली आहे. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला व पेरण्या झाल्या, त्या भागास आता पावसाची नितांत गरज आहे. पावसाअभावी नुकतेच अंकुरलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पेरणीपश्चात पाऊस गायब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनी तुषार संचाद्वारे सिंचन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरडवाहू क्षेत्र संकटात सापडले आहे. नव्या आशेची पेरणी केली. मात्र, आता पावसाअभावी हे स्वप्नच करपू लागल्याने शेतकरी पुरता हादरला असून पेरणी झालेल्या व पेरणीसाठी आसुसलेल्या तालुक्यातील एकूण शेतीक्षेत्राला पावसाची नितांत गरज आहे.

३७ हजार १६७ हेक्टरावरील पिके धोक्यात

चिखली तालुक्यात एकूण लागवडीचे क्षेत्र ८८ हजार ४२३ हेक्टर आहे. यापैकी ३७ हजार १६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यामध्ये २८ हजार ९९५ हेक्टर सोयाबीन, ३ हजार ५२२ हेक्टर तूर, १ हजार ४३६ हेक्टर मूग, १ हजार ८६१ हेक्टर उडीद, १ हजार २०७ हेक्टर कापूस, १२ हेक्टर ज्वारी, ६ हेक्टर बाजरी, ७१ हेक्टर मका, ३५ हेक्टर भूईमूग, २ हेक्टर तीळ व २० हेक्टरावर इतर कडधान्य पिकांची पेरणी झालेली आहे.

५१ हजार २५६ हेक्टरावरील पेरण्या रखडल्यात

अमडापूर, उंद्री आणि एकलारावगळता उर्वरीत ८ मंडळात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यातील २३ दिवसांच्या कालावधीत केवळ ७ ते ८ दिवस भाग बदलून पाऊस झाला. एकदाही सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झालेला नसल्याने अद्यापही तालुक्यातील ५१ हजार २५६ हेक्टरावरील पेरण्या रखडलेल्या आहेत.