शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या मण्यांचा पाऊस! ऐकताच नागरिकांची हायवेवर झुंबड उडाली; ज्याच्या त्याच्या हाती मणी...

By संदीप वानखेडे | Updated: August 12, 2022 12:35 IST

महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्सपासून ते मांदणी फाट्यापर्यंत काही जण सोन्याचे समजून नकली मणी उचलत होते़.

राज्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरु आहे. बांद्यापासून ते अगदी गडचिरोलीपर्यंत पाणीच पाणी झालेले आहे. यामुळे लोक घरात आसरा घेत आहेत. असे असताना राज्यातील एका जिल्ह्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बघताबघता कामधाम सोडून लोकांनी थेट हायवे गाठत मणी शोधायला सुरुवात केली. 

प्रकार आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातला. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या औरंबागाद-नागपूर राज्य महामार्गावरील मादणी फाट्याजवळ (Mumbai Aurangabad Nagpur Highway) डोनगावजवळ 10 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. महामार्गाच्या बाजुला काहींना सोन्यासारखे दिसणारे मणी पडलेले दिसले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्सपासून ते मांदणी फाट्यापर्यंत काही जण सोन्याचे समजून नकली मनी उचलत होते़. हायवेवरून ये-जा करणारे, गावातील लोक साचलेल्या पाण्यात देखील हे मणी शोधू लागले. गाड्या रस्त्यावर लागल्याने वाहतूकही खोळंबली. हे मणी विखुरलेले असल्याने जो तो इकडे तिकडे टकमक पाहत, मिळाला रे मिळाला असे ओरडत आनंद व्यक्त करत होता. अखेर पोलिसांना या ठिकाणी यावे लागले. पोलिसांनी हे मणी खरेच सोन्याचे आहेत का हे तपासले. तर ते नकली असल्याचे समोर आले. ते सोन्याचे नव्हतेच तर सोन्याचा मुलामा दिलेल्या वेगळ्याच धातूचे होते. आता या लोकांची पंचाईत झाली. हातात सोन्याचे मणी पण ते सोन्याचे नाहीत, आता करायचे तरी काय लोकांनी व्हिडीओ काढले, सोशल मीडियावरही पोस्ट झाले. 

अफवांचा बाजार पसरला सोन्याचे मणी पाहून यावर मंथन सुरू झाले़ कोणी म्हणत की मोटारसायकल वरून महिला चालली असेल तिच्या गळयात असलेली एकदानी पोथ तुटून पडली असेल तर काहींनी चोरट्यानी पोलिसांच्या धाकाने कोणी सोन्याचे मणी फेकून दिले असतील असे विविध तर्क वितर्क लावत होते़ मात्र काहींनी मणी फोडून पाहिल्यावर तो चपटा न होता सरळ फुटून तुकडे तुकडे झाले़  ज्याने सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्या सारखे दिसणारे नकली होते याची खात्री पटली जीवाचे हाल करून मणी वेचणाऱ्याना स्वत:वरच हसू यायला लागले़.

टॅग्स :Goldसोनं