शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पाऊस; टीनपत्रे उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 11:25 IST

Khamgaon News : शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्यादरम्यान जोरदार वादळी वाºयासह पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्यादरम्यान जोरदार वादळी वाºयासह रिमझिम पाऊस झाला. या वाऱ्यामुळे टिनपत्रे उडाली असून, अतिक्रमीत जागेतील काही दुकानेही रस्त्यावर पडली. शुक्रवारी दिवसभर कडक उन्ह  असतांनाच ४ वाजताच्यादरम्यान अचानक जोरदार वादळी-वारा सुरू झाला. त्यामुळे घरावरील टिनपत्रे उडाली. तसेच बसस्थानक ते नांदुरा मार्गावरील जलंब नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला अतिक्रमित जागेवर असलेली टपराची दुकाने उलटून रस्त्यावर पडली. यादरम्यान काही वेळाकरिता वाहतूक विस्कळीत झाली होती. लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने अनर्थ टळला. सायंकाळी ४.३० वाजताच्यादरम्यान रिमझिम पाऊस झाला. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली दुकाने बाजुला केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.

शहरातील वीजपुरवठा खंडीतशुक्रवारी सायंकाळी वादळी वारा सुरू होताच वीजपूरवठा खंडीत झाला. शहरातील बसस्थानक परिसर, वाडी, तायडे कॉलनी, अग्रसेन चौक परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. उशीरापर्यंत वीजपूरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वारंवार वीज पुरवठाही या कालावधीत खंडीत होत होता.

वरवट बकाल परिसरात जोरदार पाऊसशुक्रवारी दुपारच्या सुमारास संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल परिसरातही जोरदार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद महसूल विभागाकडे नाही.