सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
माेताळा : शहरातील प्रभाग क्रमांक सतरामधील विद्युत रोहित्राजवळील वाढलेली झाडीझुडपे तथा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी मनसेच्यावतीने नगर पंचायत प्रशासन व महावितरणकडे २१ जून रोजी एका निवेदनातून करण्यात आली आहे.
कचरा गाड्या सुरू करण्याची मागणी
लाेणार : शहरात गत काही दिवसांपासून कचरा गाड्या बंद असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, अनेक ठिकाणी घाण साचली आहे़ काही नागरिक माेकळ्या जागेवरच कचरा टाकत आहेत़
शाळाबाह्य विद्यार्थी शाेध माेहीम सुरू
जानेफळ : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ११ ते १८ जून दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम सुरू आहे. परिसरातील तीन ते अठरा वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थी व कुटुंबांची माहिती शिक्षकांकडून घेण्यात येत आहे़
जमिनीची ओल पाहूनच पेरणी करावी
बुलडाणा : पावसाचे असमान विभाजन, त्याची अनियमितता पेरणीच्या हंगामात निश्चितच व्यत्यय आणणारी ठरू शकते, यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी करताना सलग दोन तीन दिवस पुरेसा पाऊस पडल्यावर व जमिनीत उपयुक्त ओल यांची खात्री करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केले.
भरड धान्य खरेदी करण्याची मागणी
सुलतानपूर : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नाेंदणी केलेली आहे़ मात्र, शासनाकडून अजूनही भरड धान्य खरेदीला सुरुवात करण्यात आलेली नाही़ त्यामुळे, भरड धान्य खरेदी करण्याची मागणी हाेत आहे़
पाडळी सर्कलमधील आशा संपावर
मासरूळ : विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला आहे़ त्यामुळे, ग्रामीण भागात सुरू असलेल्या लसीकरणातून आशांनी माघार घेतली आहे़ त्याचा परिणाम लसीकरणावर हाेत आहे़
मढमार्गे धाड बसफेरी सुरू
बुलडाणा : काेराेना संसर्ग कमी हाेत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ या प्रक्रियेअंतर्गंत बसफेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत. बुलडाणा येथून मढमार्गे धाड ही बसफेरी सुरू करणयात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे़
बुलडाणा बसस्थानकात वराहांचा संचार
बुलडाणा : शहरातील बसस्थानक परिसरात वराहांचा मुक्त संचार सुरू असल्याचे चित्र आहे़ वराहांच्या उपद्रवामुळे बसची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे़ त्यामुळे, या वराहांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे़
जिल्ह्यात हिवताप जनजागृती अभियान
बुलडाणा : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सध्या हिवताप जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे़ डासांची उत्पत्तीची ठिकाणे शाेधून ती नष्ट करण्याची सूचना करण्यात येत आहे़
१७ हजार रुपयांचा गुटखा जप्त
देऊळगाव राजा : किराणा दुकानात साठवून ठेवलेला १७ हजार १९६ रुपयांचा गुटखा पाेलिसांनी जप्त केला़ या प्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे़ ही कारवाई २२ जून राेजी स्थानिक महाराणा प्रताप चाैकात करण्यात आली़
खंडित वीज पुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
धामणगाव बढे : परिसरात गत दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ थाेडा जरी पाऊस आला तरी वीजपुरवठा खंडित हाेत असल्याचे चित्र आहे़