शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय गोदाम बांधकामाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 13:39 IST

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : जिल्ह्यात ५ हजार ७६० मेट्रीक टन क्षमतेच्या चार शासकीय गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहे. या ...

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: जिल्ह्यात ५ हजार ७६० मेट्रीक टन क्षमतेच्या चार शासकीय गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामासाठी सात कोटींवर निधीला शासनाच्या अन्न, नागरी व पुरवठा विभागाने मान्यता दिली आहे. मात्र निर्णयानंतरही संबंधीत अधिकाºयांपर्यंत याबाबत कुठलेच पत्र किंवा माहिती उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील शासकीय गोदाम बांधकामाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासकीय गोदामांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यातील काही गोदामांच्या बांधकामाचे प्रस्ताव शासानाकडे पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील मोताळा, सिंदखेड राजा, मेहकर व बुलडाणा तालुक्यातील पोखरी येथे शासकीय गोदाम बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सहमती दर्शविली आहे. त्यानंतर शासकीय गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये मोताळा, सिंदखेड राजा, मेहकर व बुलडाणा तालुक्यातील पोखरी येथील ५ हजार ७६० मेट्रीक टन क्षमतेच्या शासकीय गोदाम बांधकामांचा समावेश आहे. या चारही शासकीय गोदामांच्या बांधकामासाठी सात कोटी २१ लाख ३६ हजार ४०५ रुपये निधी १५ फेब्रुवारी रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंजूर केला आहे. मेहकर येथे १ हजार ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या गोदामासाठी १ कोटी ९८ लाख १९ हजार रुपये निधी, मोताळा येथे १ हजार ८० मेट्रीक टन क्षमतेच्या गोदामासाठी १ कोटी १९ लाख ५० हजार ४०५ रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. सिंदखेड राजा येथील १ हजार ८० मेट्रीक टन क्षमतेच्या गोदामासाठी १ कोटी ५५ लाख ९० हजार रुपये व बुलडाणा तालुक्यातील पोखरी येथील १८०० मेट्रीक टन क्षमेच्या गोदाम बांधकामासाठी २ कोटी ४७ लाख ७७ हजार रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. परंतू या मान्यतेसंदर्भात अद्यापर्यंत जिल्हा पुरवठा विभाग, संबधीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यापर्यंत कुठलेच पत्र प्राप्त झाले नाही. यासंदर्भात संबंधीत अधिकारीच अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील गोदामांची क्षमता आठ हजार ८०० मेट्रीक टनसार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यात असलेल्या २० शासकीय गोदामांची क्षमता आठ हजार ८०० मेट्रीक टन आहे. धान्याच्या साठवणुकीसाठी ही गोदामे अपूरी पडत असल्याने जिल्ह्यात नवीन गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणावरून जिल्हाधिकाºयांपर्यंत शासकीय गोदामांची मागणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात शासकीय गोदामांचे बांधकाम प्रस्तावित आहे. परंतू नवीन गोदामाच्या बांधकामासाठी निधीला मान्यता मिळाल्यासंदर्भात कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही.- बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा