शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:32 IST

Buldhana News : जलसंधारणाच्या ८६९ स्ट्रक्चरपैकी तब्बल १८८ स्ट्रक्चरची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. 

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत असलेल्या जलसंधारणाच्या ८६९ स्ट्रक्चरपैकी तब्बल १८८ स्ट्रक्चरची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. आमखेड येथील दुर्घटनेनंतर यासंदर्भात माहिती घेतली असता, जलसंधारण विभागाकडे (लोकल सेक्टर) १७ फेब्रुवारी २०२१ च्या राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ही दुरुस्तीची कामे सोपविण्यात आली होती. मात्र अद्यापही या कामांना मुहूर्त निघालेला नाही. पावसाळ्यामुळे आता ही कामे दिवाळीनंतरच होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या १८८ स्ट्रक्चरपैकी ६२ स्ट्रक्चरची कामे करण्यास पूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु त्यासंदर्भातील निविदा झालेल्या नव्हत्या. आता या दुर्घटनेनंतर सुमारे आठ कोटी ५० लाख रुपयांच्या या कामांच्या निविदा काढण्यात येत असल्याचे जलसंधारण विभागाचे अधिकारी राजू झोरावत यांनी सांगितले. दरम्यान, आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही ते म्हणाले.  दुर्घटनेनंतर आता निविदा प्रक्रियेचे सोपस्कार होत असले तरी कामासाठी दिवाळीच उजाडणार आहे.

जि.प. सिंचन विभागाचा डोलारा मोठाजिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे ७५ सिंचन तलाव, ३४५ पाझर तलाव, १९८ गाव तलाव आणि २०१ कोल्हापुरी बंधाऱ्याचे व्यवस्थापन आहे. या माध्यमातून १९ हजार ५०० हेक्टरच्या आसपास या विभागाची महत्तम सिंचन क्षमता आहे. मात्र बहुतांश स्ट्रक्चर हे जुने झालेले आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही गरज निर्माण झालेली आहे.

६२ कामे हस्तांतरीतजिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडील ६२ कामे आमच्याकडे हस्तांतरित झालेली आहेत. या कामांची निविदा सध्या काढण्यात येत आहे. आमखेड येथील फुटलेला माती तलावाचा या कामामध्ये समावेश नसल्याचे जलसंधारण अधिकारी वैभव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

आमखेडचा माती तलाव जुनाच

जिल्हा परिषदेंतर्गतचा आमखेडचा माती तलाव हा १९८० च्या दशकातला आहे. तो २८ जूनरोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान फुटल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले. परिसरातील अेाढ्यांनाही या काळात पूर आल्याने हे पाणी नदी-नाल्यात सामावू शकले नाही व शेतीमध्ये ते घुसल्याने मोठे नुकसान झाले. दुसरीकडे आमखेडनजीकच असलेला अंबाशी येथील तलाव मात्र सुरक्षित असल्याचे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे अभियंता पवन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा