शनेश्वरवाडी येथील शनिमंदिरासमोर सभामंडप करण्यात यावा, अशी मागणी मासरुळ व परिसरातील गावकऱ्यांनी अनेकवेळा केली होती. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या हस्ते येथील सभामंडपाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख लखन गाडेकर, सुधाकर आघाव, पं. स. सदस्य दिलीप सिनकर, विजय इतवारे, गजानन धंदर, सरपंच शिवहरी मांटे, सरपंच अमोल बुरजे, समाधान बुधवत, दादाराव महाले, दीपक पिंपळे, युवासेनेचे संदीप पालकर, कृष्णा पडोळ, राजू पालकर, गजानन तायडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. हांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शनिमंदिराच्या सभामंडपाचे काम माझ्या हस्ते संपन्न होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, तसेच परिसरातील देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मनोगत यावेळी जालिंधर बुधवत यांनी व्यक्त केले.
मासरूळ येथील शनिमंदिराच्या सभामंडपाचा प्रश्न लागला मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST