शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:03 IST

दिवाळीच्या आधी मानधन व्हावे, ही अपेक्षा होती; परंतु दिवाळी झाल्यानंतरही त्यांना मानधन मिळालेले नाही.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ग्रामीण भागात गाव स्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. निदान दिवाळीच्या आधी मानधन व्हावे, ही अपेक्षा होती; परंतु दिवाळी झाल्यानंतरही त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे रोजगार सेवकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.खामगाव तालुक्यात एकूण ९७ ग्राम रोजगार सेवक काम करतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे पुर्ण करून घेण्यात ग्राम रोजगार सेवकांची महत्वाची भुमिका असते. ग्राम रोजगार सेवकांना कामाचे स्वरूप पाहून मानधन ठरविण्यात येते. गाव पातळीवर घरकूल बांधकाम, वृक्ष लागवड, तुती लागवड, विहिरी यासह विविध कामे करून घेण्यासाठी ग्राम रोजगार सेवक योगदान देतात. दरम्यान खामगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना गत जानेवारी महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याचे रोजगार सेवकांचे म्हणने आहे. निदान दिवाळीपुर्वी तरी मानधन होईल, अशी अपेक्षा असताना त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. रोजगार सेवकांची दिवाळीही अंधारातच गेली आहे. याआधी तत्कालीन बीडीओ यांना निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी रोजगार सेवकांनी केली होती, परंतु यावरही काही झाले नाही. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गौरव खोडके व गटविकास अधिकारी राजपूत यांच्या कानावरही मानधनाचा विषय घालण्यात आला.परंतु निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत अद्यापही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. एकीकडे तोकड्या मानधनावर काम करावे लागत असताना, रक्कम वेळेवर मिळत नसल्याने ग्राम रोजगार सेवकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खामगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचे साधारणपणे ५ ते ३० हजार रूपयांपर्यत मानधन रखडले असल्याचे ग्राम रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी सांगितले. दरम्यान अलीकडेच झालेल्या चर्चेनुसार येत्या १० तारखेपर्यंत रोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा मार्गी लागेल, असे संबंधित विभागाचे म्हणने असल्याचे सांगतानाच, जोपर्यंत मानधन प्रत्यक्ष खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत याची श्वाश्वती देणे अवघड असल्याचेही महाले म्हणाले.ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. एक ते दोन दिवसात रक्कम खात्यात जमा करण्यात येईल.-गौरव खोडकेसहाय्यक कार्यक्रम अधिकारीम.गां. रा. ग्रा.रो.ह.यो., खामगाव.एकीकडे तोकड्या मानधनावर काम करावे लागत असताना, आहे ते मानधन वेळेवर मिळत नसल्याने रोजगार सेवकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.-ज्ञानेश्वर महाले, तालुकाध्यक्ष, ग्राम रोजगार सेवक संघटना.

टॅग्स :khamgaonखामगाव