शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी मांडली हरतालिकेची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:41 IST

मलकापूर : विद्यमान जि.प. सदस्याकडून सुरू करण्यात आलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या अखत्यारीतील महिला सरसावल्या आहेत. यासाठी महिलांनी गुरुवारी अस्तित्व संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयात ठाण मांडून हरतालिकेची पूजा केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देमलकापूर उपविभागीय कार्यालयात ठिय्याएसडीओ कार्यालयात ठाण मांडून केली हरतालिकेची पूजा दारूबंदीचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विद्यमान जि.प. सदस्याकडून सुरू करण्यात आलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या अखत्यारीतील महिला सरसावल्या आहेत. यासाठी महिलांनी गुरुवारी अस्तित्व संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयात ठाण मांडून हरतालिकेची पूजा केल्यामुळे एकच खळबळ उडाली.यासंदर्भात मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अखत्यारीतील बन्सीलाल नगर, नळगंगा नगर, चिंतामणी नगर, चैतन्यवाडी व हनुमान नगरातील महिलांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की चिंतामणी नगरीत जनता कॉलेज ते बन्सीलाल नगर रस्त्यावर जि.प. सदस्य केदार एकडे यांनी कुठल्याही परवानग्या न घेता ‘कल्याण’ नावाने दारू विक्रीचे दुकान सुरू केले आहे. हा रस्ता रहदारीचा असून, शाळकरी विद्यार्थ्यांना प्रामुख्याने मुली व महिलांना याचा त्रास होत आहे. बन्सीलाल नगरातील हनुमान मंदिरात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात ना-हरकतीविषयी ग्रामपंचायतकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.२४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास सदर दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी मलकापूर ग्रामीणच्या महिला रस्त्यावर उतरल्या. गुरुवारी महिलांचा हरतालिका हा सण असताना तो घरी साजरा न करता संतप्त महिलांनी चक्क एसडीओ  कार्यालय परिसरातच हरतालिकेची पूजा मांडली. यावेळी दारूबंदीच्या घोषणांसह भजनेही महिलांनी गायली.प्रस्तुत निवेदनावर अलका बगडे, सपना नारखेडे, प्रतिमा राजपूत, कविता गव्हाड, प्रतिभा ठाकूर, विद्या अढाव, रूपाली धारस्कर, अर्चना राजपूत, वर्षा चौधरी, जयश्री उद्गे, सविता राजपूत, अनिता राजपूत, प्रमिला पाटील, आशा मंडवाले, सविता जोशी, मालती भारंबे, शोभा कोलते, ममता सुरडकर, प्रमिला तुले, निलीमा वराडे, करुणा भोंबे, मनीषा वराडे, प्रीती चौधरी, रेखा नाफडे, सुनीता सावळे, कल्पना खडसने, जयश्री चोपडे, मनीषा मुंधोकार आदी महिलांच्या स्वाक्षरी आहेत. दारू दुकान बंदीसाठी महिलांनी केलेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

दारूबंदीचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात दारू दुकान बंद करण्यासाठी अस्तित्व संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात महिला एसडीओ कार्यालयात ठाण मांडून होत्या. तब्बल सहा तासांनंतर आंदोलनकर्त्या महिलांना उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनी चर्चेसाठी पाचारण केले. याविषयीची लेखी माहिती वरिष्ठांना दिल्याचे सांगून २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी याविषयी निर्णय घेतील, असे त्यांनी आश्‍वस्त केले. यावेळी डीवायएसपी गिरीश बोबडे, पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे, नायब तहसीलदार विजय पाटील हजर होते. आंदोलन चिघळू नये, याकरिता दंगा काबू पथकही तैनात करण्यात आले होते.