जिल्ह्याची मलेरियामुक्तीकडे वाटचाल
बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असताना मलेरिया रुग्णांची संख्या घटल्याचे दिलासादायक चित्र आहे. जागतिक मलेरिया दिनानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेतला असला गत दाेन वर्षात केवळ १८ रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागात लग्नांमधील गर्दी कमी हाेईना
माेताळा : तालुक्यातील ग्रामीण भागात लग्न समारंभामध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याचे चित्र आहे. नवीन नियमानुसार केवळ २५ लाेकांना लग्न समारंभाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र, शेकडाे नागरिक लग्न साेहळ्यांना उपस्थित राहात असल्याचे चित्र आहे.
यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड
माेताळा : तालुक्यातील कोल्ही गवळी येथील जागृत दैवत श्री महाबळेश्वर महाराज संस्थान यात्रा यावर्षीही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमाेड झाला आहे. मराठवाडा, खान्देश व विदर्भाच्या सीमेवर वसलेले श्री महाबळेश्वर महाराज संस्थान सर्वत्र परिचित आहे.
ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन आमसभा
बुलडाणा : काेराेनामुळे सार्वजनिक कार्यक्रम, बैठका, मेळावे घेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची आमसभा घेता येत नसल्याकारणाने ही आमसभा ऑनलाईन पध्दतीने २८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रकाश पिंपरकर यांनी कळविले आहे.
जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी
बुलडाणा : काेराेना संसर्गाची दुसरी लाट शहरांसह ग्रामीण भागात सुरू आहे. रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्रामपंचायतींनी जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी हाेत आहे. पहिल्या लाटेच्या वेळी सर्वच ग्रामपंचायतींनी ही फवारणी केली हाेती.
जागतिक वसुंधरा दिन साजरा
लाेणार : नगर पालिकेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. आमदार संजय रायमुलकर यांनी नगर पालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या घन वन प्रकल्प आणि राेप वाटिकेला भेट दिली. यावेळी फिल्टर प्लांट येथे रायमूलकर यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले.
जिल्ह्यातील असंघटीत कामगारांना मदत द्या
बुलडाणा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत विविध निर्बंध लावले आहेत. तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे, असंघटीत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे.
जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा
बुलडाणा : काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लस उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.
खैरव येथे काेराेनाचा उद्रेक
देऊळगाव राजा : काेराेना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून, शहरांसह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील खैरव येथे काेराेनाचा उद्रेक झाला असून, गावातील ५० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. संपूर्ण गावच कंटन्मेंट झाेन झाल्याचे चित्र आहे.
मानधन रखडल्याने निराधार संकटात
धाड : आयुष्याच्या शेवटच्या काळात सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाच्या वतीने निराधारांना विविध याेजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. मात्र, गत दाेन महिन्यांपासून निराधारांचे अनुदान रखडल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
लिंबू उत्पादक शेतकरी संकटात
बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. तसेच अनेक निर्बंध लादले आहेत. सकाळी ७ ते ११ पर्यंतच भाजीपाला विक्रीला परवानगी असल्याने भाजीपाला व लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.