शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा संवर्धनासाठी साडेसात लाखांची तरतूद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:58 IST

बुलडाणा: पूर्वी र्मयादित स्वरूपात म्हणजे २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनालाच मराठी भाषेचा कळवळा दिसून येत होता; मात्र आता मराठी भाषा संवर्धनास प्राधान्य देण्यात येत असून, त्यातच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी विभागाकडून वर्षभर ‘मराठी भाषा संवर्धन उपक्रम’ राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देभाषेचा वाढतोय गोडवा विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून भाषा संवर्धनासाठी प्रयत्न

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पूर्वी र्मयादित स्वरूपात म्हणजे २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनालाच मराठी भाषेचा कळवळा दिसून येत होता; मात्र आता मराठी भाषा संवर्धनास प्राधान्य देण्यात येत असून, त्यातच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी विभागाकडून वर्षभर ‘मराठी भाषा संवर्धन उपक्रम’ राबविण्यात येत आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून वर्षभरासाठी ७ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने आता पावले पुढे पडू लागली आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पृष्ठभूमीवर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही बाब समोर आली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा शासकीय,  व्यावहारिक कामकाज यासह सर्व क्षेत्रात पूर्णपणे वापर व्हावा, ही ज्ञानभाषा व्हावी, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध सामाजिक संस्था राज्यात कार्यरत आहेत. तसेच मराठीच्या वापरासाठी साहित्य क्षेत्रातील लोकही कमी पडत नाहीत; परंतु कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी या दिवशीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धनाला उजाळा दिल्या जात असल्याची वस्तुस्थिती आहे. शासनाकडून मराठी संवर्धनासाठी अपेक्षित अशी विशेष तरतूद होताना दिसून येत नाही; मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग मराठी भाषा संवर्धनाबाबत सध्या जागरूक झाल्याचे दिसून येत आहे.  विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून वर्षभरात राबविण्यात येणार्‍या उपक्रमाला ‘मराठी भाषा संवर्धन उपक्रम’ हे अर्थपूर्ण शीर्षकच दिलेले आहे. दरम्यान, २२ जानेवारी साहित्य अकादमी आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसाहित्याचा आधुनिक मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र अमरावतीला घेण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा गोडवा निर्माण व्हावा, या उद्देशाने विविध कविसंमेलन, वादविवाद स्पर्धा, कार्यशाळा घेण्यात येत आहेत. अमरावती विद्यापीठांतर्गत येणार्‍या बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती व यवतमाळ येथील मराठी विभागप्रमुखांकडून कार्यक्रम होताहेत.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास आजपासून प्रारंभमराठी भाषेचा सर्वांगीण विकास व भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने शासनस्तरावरून १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यामध्ये केवळ मराठी विभागाचाच सहभाग महत्त्वाचा नाही तर शाळा, महाविद्यालय व सर्वच शासकीय कार्यलय, सामाजिक संस्था अशा सार्वत्रिक स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. 

मराठी विभागाचा लोककला महोत्सवावर भरसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी विभागाकडून लोककला महोत्सवावरही भर दिल्या जात आहे. गतवर्षी आदिवासी लोकनृत्याचा लोककला महोत्सव मराठी विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विदर्भातील सर्वच लोककलावंत बोलावण्यात आले होते. तसेच आता साहित्य आकादमीचा राष्ट्रीय स्तरावरील लोककला महोत्सवही अमरावती विद्यापीठात होऊ शकतो, अशी माहिती अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखांनी दिली आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी अमरावती विद्यापीठ मराठी विभागाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा सार्वत्रिक असल्याने सर्व विभागाने यासाठी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अद्यापही शासकीय कार्यालयात मराठी भाषा संवर्धनाविषयी जागृतीची गरज आहे. - डॉ. मनोज तायडे, मराठी विभाग प्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा