शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज विकास प्रकल्पासाठी तरतूद

By admin | Updated: August 13, 2015 00:17 IST

१४९ कोटी ५१ लाख मंजूर ; उच्चस्तरीय बैठकीत कृती आराखड्याचे सादरीकरण.

बुलडाणा : लोकसहभागातून विद्युत विकास ही अभिनव संकल्पना आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली होती. या संकल्पनेला वीजमंत्र्यांनी ह्यपायलट प्रोजेक्टह्ण म्हणून मान्यता दिल्यानंतर बुलडाणा विधानसभा मतदार संघातील वीज नियोजनाच्या अनुषंगाने विशेष ग्राम सभा अभियानाच्या माध्यमातून बुलडाणा विधानसभा क्षेत्रासाठी १४९ कोटी ५१ लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याचे १२ ऑगस्ट रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मुंबई येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत १४९ कोटी ५१ लाखाची तरतूद करण्यासाठी मंजुरात देण्यात आली आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून विद्युत विकास हा कल्पक पथदश्री प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १00 ग्रामसभांच्या माध्यमातून वीजविषयक धोरण निश्‍चित करण्यात आले होते. यामधून साकारण्यात आलेल्या कृती आराखड्याचा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तपशीलवार आढावा घेतला. त्यानुसार १00 के.व्ही.च्या ६९0 रोहित्रांची (डी.पी.) गरज लक्षात घेता २0८ रोहित्रांसाठी तातडीने वित्तीय तरतूद उपलब्ध करून देण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. उर्वरित वीज रोहित्रांसाठी टप्प्या-टप्प्याने वित्तीय तरतूद उपलब्ध करून देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी विभागास दिले. वीज रोहित्रांसाठी आराखड्यानुसार बुलडाणा विधानसभा क्षेत्रात आगामी ५ वर्षात १0९३ डी.पी. उभारण्यात येणार असून, त्यासाठी एकूण ५५ कोटी ५७ लक्ष रुपये खर्च होणार आहे. हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याची सर्व राज्यात कशाप्रकारे अंमलबजावणी करता येईल, याबाबतसुद्धा विभागाने आ.हर्षवर्धन सपकाळ यांचे मार्गदर्शन करून धोरणात्मक आखणी करण्याच्या सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. लोकसहभागातून विद्युत विकास हा प्रकल्प राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये परिस्थितीसापेक्ष बदल अथवा सुधारणा तालुक्याच्या समितीचे अध्यक्ष या नात्याने आ.सपकाळ यांच्या मान्यतेने करण्याबाबतच्या सूचनासुद्धा यावेळी ऊर्जामंत्री यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव खुल्लर, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अभिजीत देशपांडे, शिंदे, बुलडाण्याचे अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार उपस्थित होते.