कोविड १९ मुळे जनजिवन विस्कळीत झालेले आहे. व्यवसायिक डबघाईस आलेले आहे. लोकांना रोजगार नाही. अनुदान तत्वावर शासनाच्या ज्या योजना चालतात, त्यांचे तात्काळ वाटप करावे. सामाजिक न्याय विभागा अंतर्गत समाज कल्याण विभागामध्ये सबलीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी शेती विक्रीसाठी लावलेल्या आहेत. शेती खरेदी करण्याची शासनाची सर्व प्रक्रिया ठप्प आहे. ती सुरु करावी, महात्मा फुले महामंडळाच्या मार्च २०१९ थेट कर्ज प्रकरणाची वाटप झालेली नाहीत. ते वाटप तात्काळ सुरु करावे, बँकानी विविध महामंडळाचे कर्ज प्रकरणाचे टार्गेट पुर्ण करुन बेरोजगार लोकांना व्यवसाय सुरु करण्यास मदत करावी, आदीसह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर राज्य अध्यक्ष अंबादास घेवंदे, जिल्हध्यक्ष माणिकराव नराेटे पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शारदा पवार यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.
शासकीय याेजनांसाठी निधी उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST