शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले; संतप्त शेतकऱ्यांचे रस्त्यावरच अर्धनग्न ठिय्या आंदोलन

By सदानंद सिरसाट | Updated: January 1, 2024 18:13 IST

सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी

सदानंद सिरसाट : खामगाव, जि. बुलढाणा: विविध मागण्यांसाठी बोरी अडगाव येथून निघालेला शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी बाजार समिती यार्डासमोर रोखून धरला. यामुळे शेतकरी संतप्त झाले. सरकार विरोधी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी रस्त्यावरच अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी आंदोलक शेतकरी व पोलिसांमध्येच जुंपली होती.

रेनगेज यंत्र किती एरिया (डायमीटर) व्यापते, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याने दुष्काळ व पीकविम्याची समस्या आहे. तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीकविमा १०० टक्के मिळावा, यलो मोझॅक मुळे झालेल्या नुकसानीची मदत तत्काळ व सरसकट द्यावी, वन्यप्राण्यांपासून पिकाच्या रक्षणाला तार कुंपणाला १०० टक्के अनुदान मिळावे, मन प्रकल्पातील पाणी रब्बी हंगामात परिसरातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी मिळावे, रेशन मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना नियमित मिळावे, शेताचे पाणंद रस्ते मोकळे करून भरण्यात यावे, पिंपरी मोहदर (उजाड) शेत शिवार अडगाव ग्रामपंचायतला जोडावे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील बोरी अडगाव येथे २७ डिसेंबरपासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. मात्र, शासन प्रशासनाने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गावातून ट्रॅक्टर मोर्चा काढला.

२८ ट्रॅक्टरमध्ये बसून शेकडो शेतकरी खामगावच्या दिशेने निघाले. दुपारी शेतकऱ्यांचा हा मोर्चा खामगावात दाखल होताच विकमसी चौकातील बाजार समिती यार्ड समोर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवला. यावेळी पोलिस व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र, पोलिस सर्व ट्रॅक्टर घेऊन जाऊ देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरच अंगावरील कपडे काढून बसून अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :agitationआंदोलन