शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

‘मेहकर ग्रामीण’चा स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:27 AM

नवीन  मेहकर ग्रामीणची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी, यासाठी  पंचायत समिती स्तरावरून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून, लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस् ितत्वात येणार असल्याचे संकेत गटविकास अधिकारी आर.पी. पवार यांनी दिले आहेत. 

ठळक मुद्देप्रक्रिया प्रगतीपथावर शहरातील १३ वस्त्यांचा होणार समावेश  

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शहरातील डोणगाव रोड परिसरातील काही भाग हा  नगरपालिका हद्दीबाहेर टाकण्यात आला असून, कोणत्याच ग्राम पंचायतला जोडण्यात आला नाही. त्यामुळे या भागात नवीन  मेहकर ग्रामीणची  स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी, यासाठी  पंचायत समिती स्तरावरून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याची  प्रक्रिया प्रगतीपथावर असून, लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस् ितत्वात येणार असल्याचे संकेत गटविकास अधिकारी आर.पी.  पवार यांनी दिले आहेत. शहरातील पटवारी कॉलनी, शेळके कॉलनी, पवनसुत नगर,  शिक्षक कॉलनी, बालाजीनगर, तेजस्वी कॉलनी, राष्ट्रमाता  जिजाऊनगर,  गजानननगर, समतानगर, संताजीनगर, चनखोरे  कॉलनी, विठ्ठलनगर, संभाजीनगर आदी १३ वस्त्यांचा भाग हा  नगरपालिका हद्दीबाहेर  टाकण्यात आला होता. या भागात पक्के  रस्ते, नाल्या, स्ट्रिट लाइट, पाणी आदी सुविधा देण्यात आल्या  नव्हत्या. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी नेमकी कोणाकडे  मागणी करायची, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला  होता. विकास करण्याची कोणीच जबाबदारी घेत नव्हते, त्यामुळे  या परिसरातील नागरिकांना नगरपालिका हद्दीत यायचे का स्वतंत्र  ग्रामपंचायत करायची, यासाठी पंचायत समिती स्तरावरून  नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी खा. प्रतापराव जाधव,  आ.संजय रायमुलकर  आदींच्या उपस्थितीत २६ ऑक्टोबर रोजी   सभा घेणयात आली. या सभेला परिसरातील नागरिकांना आमंत्रि त करण्यात आले होते. या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन  नगर पालिका हद्दीबाहेर असलेला हा भाग न. पा. हद्दीत घ्यायचा  की स्वतंत्र ग्रा.पं.ची निर्मिती करायची, याबाबत मते घेण्यात  आली. यावेळी स्वतंत्र ग्रा.पं.ची निर्मिती करावी, असे नागरिकांनी   सांगितले, तर खा. प्रतापराव जाधव आ. संजय रायमुलकर यांनी  सांगितले, की  विकास कामांसाठी नागरिकांच्या पाठीमागे सदैव  खंबीरपणे उभे आहोत. नवीन ग्रा.पं. अस्तित्वात आणण्यासाठी  आम्ही सतत प्रयत्न करू, असे सांगितले. सभेत झालेल्या  चर्चेनुसार या परिसरासाठी  नवीन ग्रा.पं. झाली पाहिजे, असा सूर  निघाला. त्यामुळे मेहकर ग्रामीणची नवीन ग्रा.पं. अस्तित्वात  आणण्यासाठी मेहकर पंचायत समितीच्यावतीने सकारात्मक प्रस् ताव वरिष्ठांकडे व त्यानंतर मंत्रालयात पाठविण्यात येणार आहे,  असे गटविकास अधिकारी पवार यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत