लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शहरातील डोणगाव रोड परिसरातील काही भाग हा नगरपालिका हद्दीबाहेर टाकण्यात आला असून, कोणत्याच ग्राम पंचायतला जोडण्यात आला नाही. त्यामुळे या भागात नवीन मेहकर ग्रामीणची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी, यासाठी पंचायत समिती स्तरावरून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून, लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस् ितत्वात येणार असल्याचे संकेत गटविकास अधिकारी आर.पी. पवार यांनी दिले आहेत. शहरातील पटवारी कॉलनी, शेळके कॉलनी, पवनसुत नगर, शिक्षक कॉलनी, बालाजीनगर, तेजस्वी कॉलनी, राष्ट्रमाता जिजाऊनगर, गजानननगर, समतानगर, संताजीनगर, चनखोरे कॉलनी, विठ्ठलनगर, संभाजीनगर आदी १३ वस्त्यांचा भाग हा नगरपालिका हद्दीबाहेर टाकण्यात आला होता. या भागात पक्के रस्ते, नाल्या, स्ट्रिट लाइट, पाणी आदी सुविधा देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी नेमकी कोणाकडे मागणी करायची, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला होता. विकास करण्याची कोणीच जबाबदारी घेत नव्हते, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नगरपालिका हद्दीत यायचे का स्वतंत्र ग्रामपंचायत करायची, यासाठी पंचायत समिती स्तरावरून नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी खा. प्रतापराव जाधव, आ.संजय रायमुलकर आदींच्या उपस्थितीत २६ ऑक्टोबर रोजी सभा घेणयात आली. या सभेला परिसरातील नागरिकांना आमंत्रि त करण्यात आले होते. या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन नगर पालिका हद्दीबाहेर असलेला हा भाग न. पा. हद्दीत घ्यायचा की स्वतंत्र ग्रा.पं.ची निर्मिती करायची, याबाबत मते घेण्यात आली. यावेळी स्वतंत्र ग्रा.पं.ची निर्मिती करावी, असे नागरिकांनी सांगितले, तर खा. प्रतापराव जाधव आ. संजय रायमुलकर यांनी सांगितले, की विकास कामांसाठी नागरिकांच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभे आहोत. नवीन ग्रा.पं. अस्तित्वात आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू, असे सांगितले. सभेत झालेल्या चर्चेनुसार या परिसरासाठी नवीन ग्रा.पं. झाली पाहिजे, असा सूर निघाला. त्यामुळे मेहकर ग्रामीणची नवीन ग्रा.पं. अस्तित्वात आणण्यासाठी मेहकर पंचायत समितीच्यावतीने सकारात्मक प्रस् ताव वरिष्ठांकडे व त्यानंतर मंत्रालयात पाठविण्यात येणार आहे, असे गटविकास अधिकारी पवार यांनी सांगितले आहे.
‘मेहकर ग्रामीण’चा स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:28 IST
नवीन मेहकर ग्रामीणची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी, यासाठी पंचायत समिती स्तरावरून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असून, लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस् ितत्वात येणार असल्याचे संकेत गटविकास अधिकारी आर.पी. पवार यांनी दिले आहेत.
‘मेहकर ग्रामीण’चा स्वतंत्र ग्रामपंचायतसाठी प्रस्ताव
ठळक मुद्देप्रक्रिया प्रगतीपथावर शहरातील १३ वस्त्यांचा होणार समावेश