शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

भरडधान्याची उत्पादकताच ठरली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:05 IST

Agriculture Sector, Buldhana बुलडाणा जिल्ह्याची उत्पादकता अद्यापही न ठरल्याने खरेदी सुरू होण्याची चिन्हे धुसरच आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भरडधान्य खरेदी ३१ डिसेंबरपर्यंतच करण्याचा आदेश असला तरी त्या आदेशानुसारच प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित धान्याची उत्पादकता कृषी विभागाने ठरवल्यानुसारच शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यात येणार आहे.  बुलडाणा जिल्ह्याची उत्पादकता अद्यापही न ठरल्याने खरेदी सुरू होण्याची चिन्हे धुसरच आहेत. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत धान्य विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गंत २०२०-२१ मध्ये ही योजना सुरू होत आहे.  भरड धान्य खरेदी योजनेंतर्गंत ज्वारी, मका, बाजरीच्या खरेदीला १ नोव्हेंबरपासून सुरूवात केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून ३१ डिसेंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑप  मार्केटिंग फेडरेशन, राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत खरेदी प्रक्रीया राबवली जाणार आहे. ज्वारी, बाजरी मका, धान, रागी या भरड धान्याची खरेदी या संस्थांकडे देण्यात आली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता कृषी विभागाने ठरवावी, त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यांकडे असलेल्या धान्याची खरेदी करण्यात येणार आहे.  बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही पिकांची उत्पादकता निश्चित झालेली नाही. लगतच्या काळात ती होईल, याची शक्यता नाही. कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगाचे अहवाल प्राप्त नाहीत. त्यामुळे उत्पादकता निश्चित करण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांची  नोंदणी केली जात आहे, असा पवित्रा घेतला आहे. उत्पादकता निश्चित केल्यानंतर शेतकऱ्यांचे किती धान्य खरेदी केले जाईल, हे पुढे येणार आहे. सोबतच प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या भरडधान्याची खरेदी करण्यासाठी आवश्यकतेनुसार केंद्राची निर्मिती संबंधित जिल्हाधिकारी करणार आहेत. प्रत्येक केंद्र व त्याठिकाणी जोडली जाणारी गावेही निश्चित केली जाणार आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्र