शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

येळ कोट येळ कोट जय मल्हारच्या गजरात शिव खंडोबाची मिरवणूक

By अनिल गवई | Updated: December 24, 2023 12:09 IST

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची रविवारी सकाळी स्थानिक शिवाजी वेस भागातील पुरातन शिव खंडोबा मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली.

खामगाव: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची रविवारी सकाळी स्थानिक शिवाजी वेस भागातील पुरातन शिव खंडोबा मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वाद्याच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी ठिकठिकाणी ठेका धरत, पिवळ्या भंडार्याची उधळण केली. तसेच येळ कोट येळ कोट जय मल्हारचा गजर केला.

येथील शिवाजी वेस भागात श्री शिव खंडोबा पुरातन मंदिर आहे. या मंदिरात शिव खंडोबाचे वर्षाकाठी  १० ते १२ उत्सव साजरे केले जातात. यंदा बुधवार १३ डिसेंबरपासून शिव खंडोबा नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सोमवार १८ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी तळी भरण्याचा कार्यक्रम झाला. शनिवार २३ डिसेबर रोजी श्रींचे जागरण कार्यक्रम पार पडला. यात गणेश कदम आणि संच यांनी भारूड सादर केले.

त्यानंतर वाघे मंडळीचा भजनाचा कार्यक्रम झाला. रविवारी पहाटे श्रींचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर शिवाजी वेस भागातून जेजुरी गडावरून अभिषेक करून आणलेल्या श्रीं खंडेरायाच्या २७१ किलो आणि ७ फुटाच्या िपतळी मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी वेस, फरशी, बालाजी प्लॉट, अग्रसेन चौक, महावीर चौक, जगदंबा छत्र, मुख्य रोड मार्गे फरशी आणि शिवाजी वेस भागात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत देवाचे मानकरी, खांदेकरी, निशाणधारी महिला आणि भाविक तसेच श्री शिव खंडोबा भक्त मंडळ, श्री शिव खंडोबा महिला भजनी मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

पारंपारिक वाद्यावर अनेकांनी धरला ठेका

डीजेमुक्त मिरवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी श्री शिव खंडोबा मंडळाच्यावतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सहभागी मातृशक्तीसह युवक आणि बालगोपालांनीही ठेका धरला.