शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा पगार घेऊन खासगी प्रॅक्टिस; प्रशासनाचे भय उरले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:42 IST

खामगाव(बुलडाणा) : गोरगरीब रुग्णांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा दावा करीत असले, तरी शासकीय रुग्णालयातच काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या स्वार्थीपणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झालेला दिसून येतो. राज्य शासनामार्फत एनपीए म्हणजेच नॉन प्रॅक्टिशनर अलाउन्स घेतला जात असतानाही दुसरीकडे अनेक वर्ग-१ व वर्ग-२ दर्जाच्या वैद्यकीय अधिका-यांनी मोठमोठी दवाखाने थाटली असून, खासगी प्रॅक्टिस सुरू केली असल्याने त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य सेवेवर झाला आहे. 

ठळक मुद्दे रुग्णसेवेवर परिणाम

योगेश फरपट । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव(बुलडाणा) : गोरगरीब रुग्णांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा दावा करीत असले, तरी शासकीय रुग्णालयातच काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या स्वार्थीपणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झालेला दिसून येतो. राज्य शासनामार्फत एनपीए म्हणजेच नॉन प्रॅक्टिशनर अलाउन्स घेतला जात असतानाही दुसरीकडे अनेक वर्ग-१ व वर्ग-२ दर्जाच्या वैद्यकीय अधिका-यांनी मोठमोठी दवाखाने थाटली असून, खासगी प्रॅक्टिस सुरू केली असल्याने त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य सेवेवर झाला आहे. शासकीय सेवेत एकदा प्रवेश केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांना दुस-या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही, अशी स्पष्ट ताकीद असते. तसे प्रतिज्ञापत्रसुद्धा डॉक्टरांकडून करून घेतल्या जाते. मात्र या बाबी केवळ कागदावरच उरल्या आहेत. खामगाव उपजिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयासह नांदुरा, जळगाव, चिखली, शेगाव, मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या ९८ वैद्यकीय अधिकाºयांपैकी निम्याहून अधिक डॉक्टरांनी आपल्या कार्यक्षेत्रातच दवाखाने थाटली असून, प्रशासनाच्या नाकावर टिचून खासगी व्यवसाय सुरू केला आहे. शासकीय रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांकडून दवाखान्यातील पळवापळवी बरेचदा केली जाते; मात्र सरकारी रुग्णालयापेक्षा खासगीत का होईना; पण उपचार मिळेल, या आशेने रुग्णही बळी पडताना दिसतात. पगार शासनाचा घ्यायचा व सरकारी रुग्णालयात भरती रुग्णावर अर्थकारणापोटी आपल्या खासगीत उपचार करायचा, असा प्रकार उघडपणे सुरू आहे. या प्रकाराबाबत  तक्रारीही झाल्यात. त्याची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतल्या गेली नसल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराची दखल घेऊन संबंधित डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे, अन्यथा एखादे दिवशी शासकीय रुग्णालयात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रुग्णांचा जीव मुठीत सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांना डॉक्टरांअभावी आपला जीव मुठीत घेऊन बसण्याची वेळ आली आहे. ‘ओपीडी’ची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० असल्यानंतरही अनेक ठिकाणच्या वैद्यकीय अधीक्षकांसह वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर हजर राहत नसल्याचे वास्तव लोकमत चमूच्या निदर्शनास आले. 

‘एनपीए’ घेणाºया डॉक्टरांना खासगी सेवा देता येत नाही किंवा स्वत:चे रुग्णालयसुद्धा थाटता येत नाही. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- डॉ. पी. बी. पंडित, जिल्हा शल्यचिकित्सक.

२२ पैकी १६ डॉक्टर करतात खासगी प्रॅक्टिस  एनपीए (नॉन प्रॅक्टिशनर अलाउन्स) घेऊनही खामगाव उपजिल्हा रुग्णालयातील २२ पैकी १६ डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत आहेत. एवढेच नाही, तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.बी. वानखडे हे स्वत: नांदुरा येथे खासगी प्रॅक्टिस करण्यात व्यस्त असतात. साहेबच खासगी प्रॅक्टिस करीत असल्याने इतर डॉक्टरांचे तर आपोआपच फावते.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा