शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा कारागृहात कैद्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 15:14 IST

नांदुरा येथील शालिग्राम पांडुरंग उंबरकर (वय ६०) यांच्यावर २०१७ मध्ये नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बलात्कार व पोक्सो गुन्ह्यांतर्गत बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीचा गुरुवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.नांदुरा येथील शालिग्राम पांडुरंग उंबरकर (वय ६०) यांच्यावर २०१७ मध्ये नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानुसार बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होता. आरोपीला नांदुरा पोलिसांनी अटक केली. तेंव्हापासून ते बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान गुरुवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे कारागृह प्रशासनाने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी न्यायाधीश अमोलकूमार देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार शिवाजी कांबळे, कारागृह अधीक्षक भामरे, नायब तहसीलदार अमरसिंंह पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक करुणाशिल तायडे, पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील वैद्यकिय महाविद्यालयास पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाjailतुरुंग