शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पंतप्रधान आवास योजनेचा तिढा सुटणार; सर्वेक्षणास होणार प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:52 IST

शहरातील गरीब आणि वंचितांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत आहे. सन २0२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे टप्प्या-टप्प्याने उद्दीष्ट असलेल्या आवास योजनेच्या सर्वेक्षणास येत्या आठवड्यात प्रारंभ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रकल्प व्यवस्थापन समितीशी पालिकेचा पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील गरीब आणि वंचितांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत आहे. सन २0२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे टप्प्या-टप्प्याने उद्दीष्ट असलेल्या आवास योजनेच्या सर्वेक्षणास येत्या आठवड्यात प्रारंभ करण्यात येणार आहे.‘सर्वांसाठी घरे’ हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ २५ जून २0१५ रोजी करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १00 शहरांमध्ये घरकुल बांधकामास सुरूवात करण्यात आली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या लाभार्थ्यांसाठी चार भागांची वेगळी योजना असे या योजनेचे खास वैशिष्टे असून खामगाव शहरात २0१७- २0२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीकोनातून पालिका प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये सन २0१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी ३५८ घरकुलांचे उद्दीष्ट ठरविण्यात आले असून टप्प्या-टप्प्याने २0२२ पर्यंत साडेतिन हजारावर घरकुलांची निर्मिती केली जाईल. दरम्यान, या योजनेला गती देण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. घरकुल बांधकामासाठी मुंबई येथील एका संस्थेची प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

घरकुल निर्मितीचा कंत्राट मुंबईत !खामगाव शहरातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत प्रस्तावित घरकुल बांधकामाचा कंत्राट मुंबई येथील संस्थेस देण्यात आला आहे. मुंबई येथील देवधर असोसिएटस् तर्फे डॉ. सुषमा देवधर, मुंबई यांची निविदा मंजूर करण्यात आहे. प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या संस्थेची पत्रव्यवहारही पूर्णत्वास आला आहे. परिणामी, शहरातील घरकुल योजनेचा तिढा सुटला असून, येत्या आठवड्यात सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नागरिकांच्या पालिकेत चकरा !पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी शहरातील गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी पालिकेत चकरा सुरू केल्या आहेत. वस्तुस्थितीत पालिकेच्यावतीने सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्षात लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणास आलेल्या पथकाला योग्य ती माहिती देणे अपेक्षीत असल्याचे पालिका सुत्रांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल निर्मितीसाठी मुंबई येथील एका संस्थेची प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शहरात योजनेतंर्गत सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात येईल.- धनजंय बोरीकरमुख्याधिकारी, खामगाव.