लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे नुकसान झाले असून तुरीच्या पिकाला या पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. शेगाव आणि जळगाव जामोद हे दोन तालुके वगळता अन्य तालुक्यात या पावसाने हजेरी लावलेली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यात ४.४ मिमी, चिखलीत १.९ मिमी, देऊळगाव राजा १ मिमी, सिंदखेड राजा २.१ मिमी, खामगाव ४.८ मिमी, मलकापूर २.९ मिमी, मोताळा २.४ मिमी आणि संग्रामपूर दोन मिमी या प्रमाणे पाऊस पडला आहे. दरम्यन, या अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असून तुरीला आलेली फुले गळून पडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अन्य पिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:10 IST
२४ तासात जिल्ह्यात सरासरी १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान
ठळक मुद्देतुरीला आलेली फुले गळून पडण्याची भिती निर्माण झाली आहे.अन्य पिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.