शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:29 IST

१७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने १७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. वृक्षतोड सर्रास होत असल्याने जमिनीवरील वृक्षांचे अच्छादन कमालीचे कमी झाले आहे. परिणामी अनियमीत व बेभरवशाचा पावसाळा सुरु झाला आहे. कधी नव्हे असे वाढीव तापमान यावर्षी अनुभवायला मिळाले आहे. निसर्गचक्र कायम ठेवण्यासाठी सन २०१६ मध्ये राज्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. जिल्ह्यास १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले गेले. हे उद्दिष्ट पार पाडल्यानंतर २०१७ मध्ये राज्यात १३ कोटी तर जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० वृक्ष लागवड झाली. २०१८ मध्ये राज्यात ३३ कोटी व जिल्ह्यात ४४९५३७ वृक्ष लागवड चळवळ हाती घेतली गेली. तर यावर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत सामाजिक वनीकरणच्या जिल्ह्यातील १७ नर्सरीमध्ये ५० लाख रोपे तयार झाली आहे.प्रशासन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून रोपांची लागवड करण्यात गुंतून गेले आहे. शासनाचे विविध विभाग आणि सर्वच कर्मचारी वृक्षारोपण करणार आहेत. यासाठी आता केवळ ३० ते ४० दिवसांचा अवधी उरला आहे. सामाजिक वनीकरणने आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केली आहे. यातील काही रोपे ४ फुटांपर्यंत वाढली आहेत. जिल्ह्याचे तापमान कमालीचे वाढले असतानाही कोवळी रोपे चांगले तग धरुन आहेत. वृक्ष लागवड मोहिम सुरु झाल्यावर नर्सरीमधील रोपे जिल्हाभर वाटप करण्यात येतील. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग