शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात अंत्यविधीची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 11:07 IST

Preparations for funeral at Gram Panchayat office : अंत्यसंस्कार कोठे करायचे, म्हणत ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत  ईमारत परिसरात अंत्यविधीची तयारी केल्याने खळबळ उडाली आहे. 

- सुभाष वाकोडे 

लोकमत न्युज नेटवर्क

कनारखेड : कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गुरूवारी एका वृध्देचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कोठे करायचे, म्हणत ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत  ईमारत परिसरात अंत्यविधीची तयारी केल्याने खळबळ उडाली आहे. 

 शेगाव तालुक्यातील कनारखेड गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही. गुरूवारी या गावातील चंद्रभागाबाई मारोती वाकोडे या महिोचा रात्री मृत्यु झाला.सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे गावालगतच्या शेतात पिक उभी आहे.त्यामुळे अंत्यविधीसाठी जागा नाही.गावाबाहेर शासनाची ई क्लासची किंवा शासनाची कुठलीही जमिन नाही.ग्रामस्थांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी, तहसीलदार, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी बुलडाणा, पालकमंत्री,आमदार, खासदार यांना निवेदन देवून स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली आहे. गायगाव बु,गायगाव खुर्द, व कनारखेड अशा तिन गावांची गट ग्रामपंचायत आहे. गायगाव गट ग्रामपंचायत ने सुध्दा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याकरीता ठराव घेतला आहे. 

गुरूवारी सकाळी  ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या करमणूक केंद्र परिसरात लाकडे आणून अंत्यविधीसाठी तयारी सुरू केली.

बैलगाडीत लाकडे आणून करमणूक केंद्राचे परिसरात ग्रामस्थ ठाण मांडून बसले आहेत.

कनारखेड गावातील लोकांना अंतिम संस्कार कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे शासनाचा वारंवार गावकऱ्यांनी पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची उपायोजना करण्यात आली नाही. त्यामुळे कणारखेड येथील रहिवाशांनी गावातील गायगाव गट ग्रामपंचायत च्या ईमारत परिसरातील कार्यरत असलेले करमणूक केंद्र परिसरात येऊन व अंतिम संस्कार च्या लाकड आणून आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ग्रामपंचायत च्या परिसरातमध्ये आम्ही अंतिम संस्कार करू यासाठी ठाण मांडून येथील नागरिक शासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगाव