शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

हिवरा आश्रम येथे विवेकानंद जन्मोत्सवाची तयारी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:56 AM

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम :  विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष शुकदास महाराज यांनी सुरू केलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे ५३ वे वर्ष असून, यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा महाराजश्रींच्या पश्‍चात पहिल्यांदाच साजरा होत आहे. ६ ते ८ जानेवारी  २0१८ दरम्यान हा सोहळा पार पडत असून, जन्मोत्सवासाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती ...

ठळक मुद्देविवेकानंदांच्या विचारांवर साहित्य संमेलन  ६ ते ८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम :  विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष शुकदास महाराज यांनी सुरू केलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे ५३ वे वर्ष असून, यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा महाराजश्रींच्या पश्‍चात पहिल्यांदाच साजरा होत आहे. ६ ते ८ जानेवारी  २0१८ दरम्यान हा सोहळा पार पडत असून, जन्मोत्सवासाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. हिवरा आश्रम येथे मंगळवारला आयोजित पत्रकार परिषदेत  संतोष गोरे  बोलत होते. ते म्हणाले की, ६ जानेवारीला सकाळी नऊ ते साडेदहा वाजेच्यादरम्यान रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन नियोजित आहे. जन्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ ते ९ प्रार्थना, भक्तीगीत गायनाने या सोहळ्यास सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे साहित्य संमेलन भरविले जात आहे. पहिल्या सत्रात युगाचार्य स्वामी विवेकानंदांची विचारधारा, या विषयावर सांगली येथील डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांचे व्याख्यान, दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान संत तुकाराम महाराजांचे वंशज कान्होबा महाराज, देहू यांचे कीर्तन, दुपारी दोन ते पाच शुकदास महाराजश्रींच्या प्रतिमेची सवाद्य शोभायात्रा निघणार आहे. जळगाव येथील व्याख्याते यजुवेंद्र महाजन यांचे सायंकाळी पाच वाजता व सहा वाजता स्वामी श्रीकांतानंद यांचे व्याख्यान होणार आहे, तसेच ७ व ८ जानेवारीला विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती सचिव संतोष गोरे यांनी दिली. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत आदींची उपस्थिती होती. 

तीन लाख भाविकांना होणार महाप्रसाद वाटपविवेकानंद आश्रमात विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी ८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम व दुपारी २ वाजेपासून सुमारे तीन लाख भाविकांना पुरी-भाजीचा महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. त्यानंतर प्राचार्य यशवंत पाटणे (सातारा) यांचे विवेकानंदांच्या साहित्य आणि अनुबोधांवर व्याख्यान पार पडणार असून, त्यांच्या या व्याख्यानाने विवेकानंद विचार साहित्य संमेलनाची सांगता होईल. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा