शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार; भेंडवड घटमांडणीच्या भाकिताने चिंता वाढवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 10:30 IST

सर्वांनी संघटित होऊन देशावर येणार्‍या संकटासी लढा करावा लागेल, असे भाकीत भेंडवळ घटमांडणी केले आहे.

ठळक मुद्देसुप्रसिद्ध भेंडवळ घटमांडणी केवळ चार लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली.देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल. भरपूर पाऊस होणार आहे, पीक परिस्थिती साधारण राहील.

- जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: यावर्षी देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार असून भरपूर पाऊस होणार आहे. पीक परिस्थिती साधारण राहील .तर अतिवृष्टी भरपूर होईल .देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल. संरक्षण व्यवस्था मजबूत असली तरी शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन देशावर येणार्‍या संकटासी लढा करावा लागेल,असे भाकीत भेंडवड घटमांडणी केले आहे.

सुप्रसिद्ध भेंडवड घटमांडणी केवळ चार लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली. या घटमांडणीचे भाकीत अखेर आज दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी केले.

घटामध्ये ठेवलेल्या करव्यावरील पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी पूर्णतः गायब होती. त्यामुळे संपूर्ण विश्वात नैसर्गिक संकटे येतील कुठे कृत्रिम आपत्ती येईल. परकीय शत्रूपासून घुसखोरी आतंकवादी कारवाया सुरू राहतील. साथीचे आजार पसरून जग त्रस्त होईल. अनेक ठिकाणी महापूर येतील. प्रचंड अतिवृष्टी होईल .भूकंप त्सुनामी सारखी संकटे देशावर सांगितली आहेत.

पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे पीक परिस्थिती साधारण सांगितलेली आहे. यावर्षी कुलदेवतेचा प्रकोप देशावर आहे. तर जनमानसावर तसेच पिकांवर सुद्धा रोगराई चे कमीअधिक प्रमाण राहील. चारा पाण्याची टंचाई भासणार आहे. संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. परंतु  त्यांच्यावर खूप ताण येईल .या सर्व गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, त्यामुळे देशाची आर्थिक तिजोरी खाली होऊन देश आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. आजच्या भाकितमधून वर्तविली गेली आहे.

जनजीवन संकटात येईलएकंदर पाणी पावसाने पिके वगळता इतर संकटांची या वर्षात मोठी सरबत्ती राहील त्यामुळे जनजीवन संकटात येईल. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे राहून संकटावर मात करण्याची गरज निर्माण होणार आहे, असे धक्कादायक अंदाज या वर्षीच्या भेंडवड घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद