शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव नगर पालिका स्वच्छता विभागाचा प्रताप

By admin | Updated: July 12, 2014 22:27 IST

विसर्जीत मूर्ती व निर्माल्य फेकल्या जातेय कचर्‍यात

खामगाव: गणेशोत्सवानंतर अनंत चतुदश्रीला विसर्जीत झालेल्या गणेश मूर्ती आणि निर्माल्यांची विल्हेवाट लावताना नगर पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विसर्जीत गणेश मूर्ती आणि निर्माल्याला नगर पालिका प्रशासन चक्क कचर्‍यासारखीच वागणूक देत असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत उघडकीस आले. स्वच्छतेच्या नावावर दोन दिवसांपूर्वी विहिरीत निर्माल्य आणि अर्धवट मूर्ती जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आल्या. या मूर्ती आणि निर्माल्य एका ट्रकद्वारे ' कचरा'  म्हणून फेकून देण्यात आले. पालिकेच्या या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मोठय़ा मूर्तीसह, काही घरगुती गणेश मूर्तींचेही विसर्जन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील मोठय़ा विहिरीत करण्यात येते. विविध देवी देवतांच्या मूर्तीसह अनेक महिला भाविक या विहिरीत नियमित निर्माल्यांचे विसर्जन करतात. शहरात देवी-देवतांच्या मूर्ती विसर्जनाची दुसरी पर्यायी जागा नाही. त्यामुळे या विहिरीतच निर्माल्य आणि मूर्तींचे विसर्जन केल्या जाते. दरम्यान, स्वच्छतेच्या नावावर शुक्रवारी नगर पालिका प्रशासनाकडून अर्धवट जिरलेल्या गणेश मूर्ती आणि काही निर्माल्य जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. एका ट्रकद्वारे हे निर्माल्य रावणटेकडी परिसरातील खुल्या जागेवर फेकून देण्यात आले. या ठिकाणीच नगर पालिका प्रशासनाकडून शहरातील इतर कचरा फेकल्या जातो. या कचर्‍यावरच निर्माल्य आणि अर्धवट मूर्ती फेकण्यात आल्यामुळे शहरातील गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड चिड व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने निर्माल्या सारख्या वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावायला हवी होती.** शहरात कचर्‍याचे जागोजागी ढिग !शहरात जागोजागी कचर्‍याचे ढिग साचले आहेत. या कचर्‍यांबाबत वारंवार ओरड करूनही नगर पालिका प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही. या कचर्‍याबाबत तक्रार निवेदनही नागरिकांनी सादर केली आहेत. मात्र, हा कचरा साफ केल्या जात नाही. याऊलट गणेशोत्सवाला दोन-तीन महिन्यांचा कालावधी असतानाही विहिर स्वच्छ करण्याचे औचित्य काय? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.