शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सत्तेसाठी काहीपण !

By admin | Updated: March 15, 2017 01:42 IST

निवडणुकीपूर्वी प्रखर टीका, नंतर एकत्र

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. १४- तत्त्व, विचारधारा आणि पक्षनिष्ठेला आता राजकारणात स्थान राहले नसून केवळ सत्ता हाच एकमेव धागा राजकीय पक्षांना बांधून असल्याचे जिल्ह्यात पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापण्याकरिता झालेल्या आघाड्यांमधून निदर्शनास येते. जिल्ह्यात पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापण्याकरिता परंपरागत विरोधी पक्षांना जवळ करीत मित्रपक्षांनाच दूर सारण्यात आले. मंगळवारी जिल्ह्यात पार पडलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात धक्कादायक आघाड्या करण्यात आल्या. भाजपने शिवसेनेला बाजुला सारून काँग्रेसला तर कुठे राष्ट्रवादीला जवळ केले. तर राष्ट्रवादीने शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांशी वेगवेगळ्या ठिकाणी युती केली आहे. कालपर्यंत धर्मांध शक्तीच्या आम्ही विरोधात असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत होते, आज मात्र त्याच धर्मांध शक्ती संबोधिलेल्या पक्षाशी त्यांनी जवळीकता साधली. कुठे सरळ पाठिंबा देवून काही ठिकाणी वेगळी खेळी खेळून या पक्षांनी एकमेकांना मदत केल्याचे स्पष्ट दिसते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेत व पंचायत समितीत मोठय़ा प्रमाणात सदस्य निवडूण आल्यावरही भाजप व काँग्रेसला सभापती पदाच्या समान जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी व शिवसेना जिल्ह्यात एकत आली तर बहूतांश पंचायत समिती त्यांच्या ताब्यात असत्या. मात्र, अशी सरळ युती न करता पंचायत समितीनिहाय युती करण्यात आली. चिखलीमध्ये तर परस्पर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा सभापती तर भाजपचा उपसभापती झाला. नांदूर्‍यातही नाट्यमय घडामोडींनंतर सभापतीपद काँग्रेसकडे तर उपसभापती पद शिवसेनेकडे गेले. लोणार व सिंदखेड राजा या दोन तालुक्यांची सीमा एकच आहे. मात्र, या दोन्ही पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या पक्षांशी घरोबा केला आहे. लोणार राष्ट्रवादीने शिवसेनेशी तर सिंदखेड राजामध्ये भाजपशी युती केली. अनेक ठिकाणी काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता प्रयत्न झाले. आगामी काळात याचे दुरगामी परिणाम दिसतील की मतदारही याकडे डोळेझाक करतील हे येणारा काळच सांगेल. जिल्हा परिषदेवर पडणार परिणाम २१ मार्च रोजी जिल्ह्यात विविध पक्षांना जिल्हा परिषद अध्यक्षासाठी सत्ता स्थापण करावी लागणार आहे. पंचायत समितीत अशाप्रकारे युती करण्यात आल्यामुळे आता जिल्हा परिषदेत कोणती युती किंवा आघाडी जन्माला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीमध्ये झालेल्या युती व आघाडीनंतर आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण करण्याकरिता शिवसेना व भाजप एकत्र येईल की नाही? याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर सारण्याकरिता जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचायत समितीमधील युती व आघाडीचा जिल्हा परिषदेवर निश्‍चितच प्रभाव पडणार आहे. निवडणुकीनंतरचे चित्र  

पंचायत समितीया पक्षांनी एकमेकांना मदत केली
बुलडाणा काँग्रेस - भारिप 
मोताळा काँग्रेस - शिवसेना
सिंदखेड राजा राष्ट्रवादी काँग्रेस - भाजप
लोणार शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस
शेगाव काँग्रेस - भारिप