शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

वीज अभियंत्यास घेराव

By admin | Updated: September 8, 2015 02:19 IST

खंडीत वीजपुरवठय़ाने देवपूर ग्रामस्थ संतप्त.

बुलडाणा : वीज कंपनीकडून महिन्याभरापासून खंडित असलेल्या वीज पुरवठय़ामुळे संतप्त झालेल्या देवपूरवासीयांनी हतेडी उपकेंद्राच्या वीज अभियंत्याला घेराव घालून ६ सप्टेंबर रोजी आंदोलन केले. दरम्यान शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेता ७ दिवसात वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात येईल, असे आश्‍वासन संबंधित अभियंत्याने दिल्यानंतर देवपूर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. बुलडाणा तालुक्यातील देवपूर, दहिद खुर्द, माळवंडी व दुधा या गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे या गावातील जीवन प्रभावित झाले. पावसाअभावी पिकांना पाण्याची असलेली आवश्यकता वीज पुरवठय़ाअभावी शेतकर्‍यांना पूर्ण करता आलेली नाही. अनेक शेतातील उभे पीक करपले आहे. या पार्श्‍वभूमीवर सदर गावातील संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सुनील तायडे, अनिल वारे, रघुनाथ नरोटे, संजय सोनुने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले देवपूर गावठाण फिडरचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, तसेच सतत गैरहजर राहणारे वीज कर्मचारी मेहत्रे व शेख आरीफ यांना निलंबित करावे, या मागण्यांसाठी वीज अभियंता इंगळे यांना घेराव घालण्यात आला; तसेच जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला, तथापि सदर मागण्या ७ दिवसात पूर्ण करण्यात येतील, असे आश्‍वासन विभागाने ग्रामस्थांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; तसेच या सर्व गैरव्यवस्थापनास जबाबदार असलेले वीज अभियंता गायकवाड यांच्यावरसुद्धा कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी रेटली; तसेच वीज विभागाच्या दिरंगाईमुळे कोणत्याही शेतकर्‍याने नैराश्येपोटी काही विपरीत प्रकार केल्यास त्याची जबाबदारी वीज विभागाची राहील, असा इशारासुद्धा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात उमाकांत वारे, कडूबा दोतोंडे, प्रभाकर वाघ, शिवानंद जाधव, कारभारी वारे, विजय पवार, आस्तिक वारे, गणेश नरोटे, भगवान वारे, राजेंद्र दोतोंडे, विजय नरोटे, अमोल वारे, पवन वारे, रामेश्‍वर वारे, संदीप जाधव, संतोष वारे, ब्रम्हानंद वारे व देवपूर, दहिद खुर्द, माळवंडी तसेच दुधा ग्रामस्थ सहभागी झाले.