शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत ग्राहकांची महावितरण कार्यालयावर धडक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:46 IST

मेहकर : वीज सुरु करण्याबाबत मागणी करूनही  काहीच उपयोग न झाल्याने नगरपालिकेचे आरोग्य सभापती  मनोज जाधव यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर  रोजी शेकडो विद्युत  ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन वीज  अधिकार्‍यांना तत्काळ वीज सुरु  करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देमेहकर शहरातील तीन नगरात चार दिवसांपासून अंधार!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर शहरातील मिलिंद नगर, कैकाडी गल्ली, इंदिरा  नगर, परिसरात गेल्या चार दिवसांपासून  अंधार आहे. वीज  कर्मचार्‍यांकडे वेळेवर वीज सुरु करण्याबाबत मागणी करूनही  काहीच उपयोग न झाल्याने नगरपालिकेचे आरोग्य सभापती  मनोज जाधव यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर  रोजी शेकडो विद्युत  ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन वीज  अधिकार्‍यांना आपल्या समस्या सांगितल्या व तत्काळ वीज सुरु  करण्याची मागणी केली.स्थानिक मिलिंद नगर, कैकाडी गल्ली, इंदिरा नगर परिसर आदी  भागासाठी विद्युत पुरवठा करणारे रोहित्र जळाल्याने या भागातील  नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून  वीज पुरवठा सुरू करणे  गरजेचे होते. मात्र वीज पुरवठा सुरु करण्यात आला नाही,  त्यामुळे या भागातील नागरिक गेल्या चार दिवसांपासून  अंधारात  आहेत, तसेच या भागातील विद्युत रोहित्र नेहमी उघडेच राहते,  त्यामुळे परिसरात खेळणार्‍या बालकाच्या  व नागरिकांच्या जीवि त्वास धोक ा निर्माण झाला आहे. रोहित्रामधून ऑइल गळणे, स् पार्कींग होणे, फ्यूज जाणे, आदी प्रकार नित्याचेच झाले आहे.  त्यामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. नगरपालिकेचे  आरोग्य सभापती मनोज जाधव यांच्या नेतृत्वात नागरिक वीज कं पनी कार्यालयावर धडकले. यावेळी वीज अधिकारी प्रशांत  कलोरे यांच्यासमोर  आपल्या समस्या मांडल्या असता , त्यांनी त त्काळ विद्युत पुरवठा सुरु करून विद्युत पुरवठय़ासंबंधित येणार्‍या  समस्या सोडविण्याचे आश्‍वासन  दिले. यावेळी न.पा. आरोग्य  सभापती मनोज जाधव, विजय माने, सीताराम माने, अरुण माने,  सुरेश बनचरे अण्णा असलकर, श्रीराम कळंबे, संजय जाधव,  रवि जाधव, जंगलु जाधव, संजय माने, हरीश बनचरे, अंकुश  ब्राम्हणे, राहुल माने, संतोष माने, अजय जाधव,पवन गोडवे, दी पक माने, स्वप्नील जाधव, नरेश बनचरे हजर होते.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन