शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन कापले;  निमखेड येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 15:23 IST

निमखेड : निमखेड येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे मागील सात ते आठ दिवसापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.

ठळक मुद्दे ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडीत केला.आठ दिवसापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी प्रश्न सोडवावा, अशी महिला मंडळाकडून मागणी होत आहे.

निमखेड : निमखेड येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे मागील सात ते आठ दिवसापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. दिवसेंदिवस खोल जात असलेली पाणी पातळी यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. हिवाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अशातच नांदुरा तालुक्यातील निमखेड येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल न भरल्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. या गंभीर समस्येकडे माद्ध मागील सात ते आठ दिवसापासून संबधीतांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

पाणी असूनही, घशाला कोरड निमखेड या गावाला  पाणी पुरवठा करण्यासाठी दोन विहीरी आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने सध्या त्या विहिरींना भरपूर पाणी सुध्दा उपलब्ध आहे.  मात्र ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिलच न भरल्यामुळे पाणी असूनही निमखेडवासीयांच्या घशाला कोरड पडली आहे.

शेतातून आणावे लागते पाणी गावाबाहेर असलेले तीन हातपंप सुरु आहे.  परंतु त्यांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने महिलांना शेजारील शेतात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तरी वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी प्रश्न सोडवावा, अशी महिला मंडळाकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)