शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कोविडबाधित रूग्णांच्या गृह अलगीकरणाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 15:33 IST

Corona Cases : ग्रामीण आणि शहरी रूग्णांची संस्थात्मक अलगीकरणात होणार रवानगी

-अनिल गवईखामगाव: ग्रामीण आणि शहरी भागातील गृह अलगीकरणातील रूग्णांच्या मुक्तसंचाराचा मुद्दा संपूर्ण जिल्ह्यात ऐरणीवर आला. परिणामी, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागत असल्याचे निर्दशनास येताच जिल्ह्यातील गृह अलगीकरणाच्या पर्यायाला स्थगिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिलेत. त्यामुळे आगामी काळात कोविड बाधित रूग्णांची संस्थात्मक अलगीकरणातच रवानगी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कोरोना विषाणू संक्रमनाच्या दुसºया लाटेचा १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात उद्रेक आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोविड केअर सेंटर, कोविड रूग्णालये अपुरे पडल्यानंतर गृह अलगीकरणाचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, ग्रामीण आणि शहरी भागातील  गृह अलगीकरणातील कोविड बाधित रूग्णांच्या मुक्तसंचाराचे प्रकार ऐरणीवर आल्यानंतर सुरूवातीला ग्रामीण भागातील गृह अलगीकरणाला (ग्रामीण आयसोलेशनचा) पर्याय देण्यात आला. त्यानंतर आता शहरी भागातील अलगीकरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी दिलेत.  तात्काळ अंमलबजावणीच्या सूचनाही संबंधित प्रशासकीय अधिकाºयांना दिले आहेत.

खामगावात नवीन कोविड केअरची चाचपणी!

-  लक्षणे न जाणवणाºया कोरोना बाधित रूग्णांना संस्थात्मक अलगीकरणाच्या निर्देशानंतर खामगाव येथे दुसरे कोविड केअर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य यंत्रणेकडून पंचशील होमिओ पॅथी रूग्णालयात कोविड केअर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्यात.खामगावात ९६४ रुग्ण विलगीकरणात!- खामगाव शहरात सातत्याने कोरोना संक्रमित रूग्णांची भर पडत आहे. दररोज सरासरी ७०-८० रूग्ण कोरोनाबाधित येत आहे. आतापर्यंत ९६४ रूग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोविड रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये जागा न मिळणाºया रूग्णांना गृहअलगीकरणाचा पर्याय दिला जात होता.  मात्र, कोरोना बाधित रूग्णाचा मुक्त संचार आणि घरावरील अलगीकरणाचे फलक गायब करण्याचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर आता गृह अलगीकरण बंद करण्यात आले आहे.

अशी आहे बाधितांची आकडेवारीपॉझिटिव्ह रूग्ण ८३२४१बरे झालेल रूग्ण ७८१०९एकुण मृत्यू ००५७३बाधित रूग्णसंख्या ०४५५९ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव