शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस गोटातून एकमेव अर्ज दाखल

By admin | Updated: April 2, 2017 16:47 IST

मोताळा: मोताळा नगरपंचायतीच्या ७ एप्रिल रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १ एप्रिल रोजी काँग्रेस गटाच्या सुवर्णा अनंतराव देशमुख यांचा एकमेव अर्ज शनिवारी दाखल झाला आहे.

मोताळा: मोताळा नगरपंचायतीच्या ७ एप्रिल रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १ एप्रिल रोजी काँग्रेस गटाच्या सुवर्णा अनंतराव देशमुख यांचा एकमेव अर्ज शनिवारी दाखल झाला आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.मोताळा नगरपंचायतीच्या काँग्रेस गटाच्या नगराध्यक्षा माधुरी पुरूषोत्तम देशमुख यांनी २३ मार्च रोजी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सात एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मोताळा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दोन वाजेनंतर त्याच दिवशी नामनिर्देशन अर्जाची छाननी होणार असून, संध्याकाळी ५ वाजता वैद्य उमेदवारांची यादी घोषित होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना  ६ एप्रिल रोजी आपले अर्ज मागे घेता येणार आहे.मोताळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी बाजी मारून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदे अविरोध प्राप्त केली होती. त्यावेळी आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात प्रथम नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या माधुरी पुरूषोत्तम देशमुख यांना प्रथम नगराध्यक्षपदाचा मान मिळाला होता. मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्ष नेतृत्वाने सव्वा-सव्वा वषार्चा फॉम्युर्ला ठरवून दिला होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षा माधुरी देशमुख यांनी २३ मार्च रोजी अप्पर जिल्हाधिकारीकडे  नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस गटाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे  ७ एप्रिल रोजी आवश्यकता भासल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शनिवारी काँग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा अनंतराव देशमुख यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी आ. हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वीय सहायक राजु केने, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अनिल खाकरे, युवा नेते गणेशसिंग राजपूत, बुलडाणा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष शरद राखोंडे, नगरसेविका हसमतबी जलील, जायदाबी शे. मुसा, सोनाली देशमुख, अंजली सुरेश खर्चे, छाया दिलीप वाघ, शे. सलीम ठेकेदार, ईस्माईल जमादार, वासुदेव इंगळे, रफीक ठेकेदार आदी उपस्थित होते. सोमवारी दोन वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे. अर्ज छाननी त्याच दिवशी दोन वाजेनंतर करण्यात येवून अर्ज फेटाळलेल्यांची नावे व कारण तसेच संध्याकाळी ५ वाजेनंतर वैद्य उमेदवारांच्या अर्जांची यादी याच दिवशी जाहीर करण्यात येईल. गुरूवारी ६ तारखेला चार वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. निवडणूक शुक्रवारी ७ तारखेला होईल.