शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी लांबण्याची शक्यता; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:27 IST

Purchase of cotton पणन महासंघाच्या प्रक्रिया निविदा प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिनिंग मालकांनी घेतला.

- नानासाहेब कांडलकर  जळगाव जामोद : कोरोना संकटकाळात जिनिंग मालकांनी कामगारांसह कापूस खरेदी व त्यावर प्रक्रिया केली. परंतु अद्यापपर्यंत पणन महासंघाने जिनिंग मालकांची बिले अदा केली नाही. उलट कापसाचे नुकसान झाल्याचे कारण पुढे करीत बिलात कपात करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे पणन महासंघाच्या प्रक्रिया निविदा प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिनिंग मालकांनी घेतला. त्यामुळे खरेदी सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. २०१९-२० च्या हंगामामधील अनेक जिनिंग मालकांचे बिल पणन महासंघाने अद्याप पर्यंत अदा केलेले नाही. कोविड-१९ च्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे मार्च महिन्यात कापूस खरेदी बंद झाली. मे महिन्यात कापूस खरेदीला पुन्हा सुरुवात करण्यात आली. जिनिंग मालकांकडे आवश्यक मनुष्यबळ व अन्य यंत्रणा अपूर्ण असतानाही महामारीच्या काळात स्वतःचा व कामगारांचा जीव धोक्यात घालून शासनाच्या निर्णयानुसार कापूस खरेदी चालू ठेवली. शेतकऱ्यांजवळील कापूस संपेपर्यंत जिनिंग मालकांनी जून, जुलै व ऑगस्ट पर्यंत कापूस खरेदी केली. काही जिनिंगवर शेतकऱ्यांचा कापूस पावसात भिजल्याने नुकसान झाले. हे नुकसान होत असताना जिनिंग मालकांनी वेळोवेळी पणन महासंघाला सूचित केले. परंतु त्याची दखल पणन महासंघाने घेतली नाही. महासंघाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या ग्रेडरला सुद्धा हे नुकसान दिसत होते. परंतु त्यांनीही कापूस खरेदी स्थगित केली नाही. आता या नुकसानीचा सर्व ठपका जिनिंग मालकांवर ठेवत पणन महासंघाने जिनिंग मालकांच्या बिलातून नुकसानीची रक्कम कपात केली. हा निर्णय जिनिंग मालकांना मान्य नसल्याने त्यांनी सन २०२०-२१ च्या निविदा प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे शासकीय कापूस खरेदी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरcottonकापूस