--फेब्रुवारीत सर्वाधिक मृत्यू--
२०२१ या वर्षात फेब्रुवारी महिन्यात १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकट्या फेब्रुवारी महिन्यात २५ जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
--झाडेगावात १४ टक्के ग्रामस्थ पॉझिटिव्ह--
जळगाव जामोद तालुक्यातील १४२८ लोकसंख्या असलेल्या झाडेगावातील तब्बल १४ टक्के ग्रामस्थ अर्थात १९७ जण आतार्पंत कोरोना बाधित आढळून आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी येथे झालेल्या तपासणीत एकाच वेळी १५५ जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर २३, एकदा ७ आणि एकदा ५ या प्रमाणे तपासणीत ग्रामस्थ बाधित आढळून आले आहे. एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के नागरिक येथे बाधित आढळून आल्याने हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी यांनीही येथील सविस्तर आढावा मधल्या काळात घेतला होता.
--असा आहे तालुकानिहाय पॉझिटिव्हीटी रेट--
तालुका--पॉझिटिव्हीटी रेट
बुलडाणा--१९.६४
चिखली--१४.४८
सिंदखेड राजा--१६.२३
लोणार--३.९०
मेहकर--५.९७
खामगाव--१२.६८
शेगाव--२३.१२
संग्रामपूर--३.०९
जळगाव जामोद--२४.८६
नांदुरा--७.५०
मलकापूर--१७.०६
मोताळा--३.२५
--संग्रामपूरमध्ये चाचण्या वाढविण्याची गरज--
संग्रामपूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात अवघ्या ४५२ संदिग्धांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे येथील पॉझिटिव्हीटी रेट हा अवघा ३.०९ आला आहे. येथे चाचण्या वाढविण्याची गरज आहे. जळगाव जामोद तालुक्यातही गेल्या महिन्यात अवघ्या १२५१ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी २५ टक्के व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे येथेही अधिक लक्ष देण्याची गरज आहे.