शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा : खरेदीअभावी शेतक-यांची तूर घरातच पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:47 IST

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ठळक मुद्दे२६ एप्रिलपर्यंत फक्त १० हजार ७०० क्विंटल खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीचा पेरा करीत असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला ४ ते ५ क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकºयांना होते. तुरीचे पीक हक्काचे समजून आणि भाव चांगला मिळतो, या भोळ्यापणामुळे शेतकरी तूर पेरतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बाजारपेठेत तुरीचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तुरीला खरेदीदार मिळत नसल्याने शासनाने तुरीचे हमीभाव ठरवून तूर खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू केले. ही जबाबदारी खरेदी-विक्री संघाकडे देऊन प्रत्येक शेतकºयाला तूर विक्रीसाठी आॅनलाइन नाव नोंदणीसाठी बँक खाते नंबर, आधार कार्ड, सात-बारा, पेरेपत्रक इ. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले. तालुक्यातील ४ हजार शेतकºयांनी दोन महिन्यांपूर्वी अर्ज नाव नोंदणीकरिता दिले. त्यापैकी केवळ ८३१ शेतकºयांची नावाची नोंद होऊन १० हजार ७३७ क्विंटल ९७ किलो तुरीची खरेदी २६ एप्रिलपर्यंत तुरीची खरेदी झाली आहे. ४ हजार शेतकºयांनी नाव नोंदणीसाठी अर्ज करूनही केवळ ८३१ शेतकºयांची तूर मोजणी झाली. आज प्रत्यक्षात ३१६९ शेतकºयांची खरेदी बाकी आहे. एकूण ४० हजार क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट असून, शेतकºयांच्या घरात २९ हजार २६३ क्विंटल तूर बाकी आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली; परंतु सिंदखेडराजा खरेदी-विक्री केंद्रावर कासव गतीने खरेदी सुरू असल्याने नाव नोंदणीसाठी अर्ज करूनही ७५ टक्के शेतकºयांना कोणताही मॅसेज प्राप्त झाला नाही. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ सुरू असून, अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय तूर खरेदी होत नाही, असा आरोप अनेक शेतकºयांनी केला. तुरीचे माप व्हावे म्हणून अनेक वेळा शेतकºयांनी आंदोलने केली. आरोप-प्रत्यारोप झाले; परंतु प्रशासकीय यंत्रणा किती धिम्या गतीने काम करते, याचा प्रत्यय शेतकºयांना आला आहे. शेतकरी हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, धर्माचा, पंथाचा नसून, तो या देशाचा अन्नदाता आहे, याचे भान ठेवून राजकीय नेत्यांनी तुरीची खरेदी वेगाने कशी होईल, याचे भान ठेवून ७५ टक्के शेतकºयांना न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा त्यांची आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा