खामगाव (बुलडाणा) : विधानसभा निवडणुकीसाठी शहरात १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून, शहरात ७१ ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र यापैकी अनेक मतदान केंद्रे क्षतिग्रस्त असल्याने, मतदानादरम्यान, अनुचित प्रकार अथवा नैसर्गिक आपत्ती (पाऊस) आल्यास या केंद्रावरील मतदान प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे.शहरातील अनेक नादुरुस्त इमारतींचा मतदान केंद्रात समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतांश इमारती या नगर परिषदेच्या मालकीच्या असून, नगरपालिका शाळा, दवाखान्याच्या इमारती गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहेत; परंतु अशाही परिस्थितीत कुठल्याही दुरुस्तीविना या केंद्रावर म तदान प्रक्रिया पार पाडल्या जाणार असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरातील सती फैल भागा तील मतदान केंद्र क्र. १३४ व केंद्र क्र. १३५ ची दयनीय अवस्था आहे. दरम्यान, या केंद्राच्या दुरुस् तीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नगरपालिका प्रशासनाला क्षतिग्रस्त मतदान केंद्र दुरुस्तीचे तत्काळ आदेश दिले आहेत. मात्र, पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मोजमापाशिवाय कुठलीही उपाययोजना गेल्या महिनाभराच्या कालावधीत करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मतदान केंद्रांची दुरवस्था
By admin | Updated: September 28, 2014 23:18 IST