शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:11 IST

Buldhana Grampanchayt Election ५२७ ग्रामपंचायतींची मुदत संपलेली असून, या ग्रामपंचायतींसाठी आता १५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देसात व दहा डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती.एक डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.अंतिम मतदार यादी आता १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.वास्तविक जानेवारी महिन्याच्या अखेरीस या निवडणुका होतील, असा अंदाज प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र, निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजीच राज्यातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने प्रशासकीय पातळीवरील पूर्वतयारीसही आता वेग आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींची सात व दहा डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती, तर एक डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सात डिसेंबरपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या.  ९ डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी आता १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकांचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींची मुदत संपलेली असून, या ग्रामपंचायतींसाठी आता १५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम१५ डिसेंबरला निवडणुकीची नोटीस तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास २३ ते ३० डिसेंबर हा कालावधी राहील. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. चार जानेवारी २०२१ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येऊन उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होईल व १८ जानेवारी रोजी निकाल  जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक