शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचा निर्णय बदलू शकते राजकारण

By admin | Updated: September 9, 2014 19:00 IST

गणेशोत्सव संपला: राजकीय घडामोडींना वेग येणार

बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँक डबघाईस आल्यानंतर या बँकेविरोधात जिल्हाभरात प्रचंड आंदोलन झाले. या बँकेमध्ये झालेली अनियमितता व घोटाळे यांची चौकशी सुरू असून बँकेचे टेस्ट ऑडीट अंतीम टप्प्यात आहे. या टेस्ट ऑडीटचा निर्णय आल्यास टेस्ट ऑडीटमध्ये दोषी आढळणार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होईल. जिल्हा बँकेच्या टेस्ट ऑडीटचा निर्णय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जिल्हा बँकेवर जिल्ह्यातील एकदोन अपवाद वगळता सर्वच लोकप्रतिनिधी संचालक मंडळावर आहेत. ही सर्व संचालक मंडळी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उभे ठाकणार आहेत. यापैकी एकावर जरी ठपका ठेवण्यात आला तर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ट ऑडीटमध्ये बँकेने आतापर्यंत मंजुर केलेल्या सर्व कर्ज व तारण प्रकरणांचा नव्याने अभ्यास केला जात आहे. यामध्ये बँकेकडे असलेली कागदपत्रे, दिलेले कर्ज, प्रत्यक्षातील वसुली तसेच नियम डावलून दिलेल्या कर्जाचा लाभ या सर्व बाबींची प्रकर्षाने तपासणी केली जात आहे. ज्या संचालकांच्या शिफारशीवरुन असे नियमबाह्य कर्ज वाटप झाले असेल किंवा ही जबाबदारी सामुहिकरित्या निश्‍चित केली तर पूर्ण संचालक मंडळ जबाबदार धरल्या जावून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते. त्या पृष्ठभुमिवर जिल्हा बँकेच्या संदर्भातील निर्णय कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेत सर्व राजकीय मतभेद विसरून राजकीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हा बँकेतील अनियमितता हा प्रचाराचा मुद्दा होणार नाही याची दक्षता सारेच पक्ष घेतात. कारण अशा निर्णयाचा फटका कुण्या एका पक्षाला बसणार नसून तो सामुहिकरित्या नुकसानकारक ठरणार आहे.