शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस प्रकरणाला राजकीय वळण; खामगाव पालिकेतील राजकीय वातावरण तापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:51 IST

खामगाव :  काँग्रेस नगरसेवकांच्या गैरवर्तनाच्या मुद्यावरून तापलेले पालिकेचे राजकारण विकोपाला जाण्याचे संकेत नजीकच्या काळात मिळत आहेत. नगराध्यक्षांच्या नोटीसला विरोधकांनी असंयुक्तिक उत्तर दिल्याचा दावा सत्ताधार्‍यांनी केला असून, यासंदर्भात पुढील कारवाईसाठी हालचाली चालविल्या आहेत. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काँग्रेस नगरसेवकांची ‘होरपळ’ होणार असल्याचे दिसते.

ठळक मुद्देविरोधकांचे उत्तर असंयुक्तिकसत्ताधार्‍यांचा दावा

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  काँग्रेस नगरसेवकांच्या गैरवर्तनाच्या मुद्यावरून तापलेले पालिकेचे राजकारण विकोपाला जाण्याचे संकेत नजीकच्या काळात मिळत आहेत. नगराध्यक्षांच्या नोटीसला विरोधकांनी असंयुक्तिक उत्तर दिल्याचा दावा सत्ताधार्‍यांनी केला असून, यासंदर्भात पुढील कारवाईसाठी हालचाली चालविल्या आहेत. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काँग्रेस नगरसेवकांची ‘होरपळ’ होणार असल्याचे दिसते.पालिकेच्या सभेतील गैरवर्तनासोबतच सभेत नारेबाजी करण्याच्या प्रकारावरून नगराध्यक्षांनी काँग्रेसच्या सर्वच १२ नगरसेवकांना नोटीस बजावली होती.  नगराध्यक्षांच्या या नोटीस प्रपंचामुळे पालिकेतील राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेस नगरसेवकांकडून ‘अशी कुठलीही घटना घडली नाही’, असे ‘कायदेशीर’ उत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या या कायदेशीर उत्तरामुळे नगराध्यक्षांनी दिलेल्या नोटीसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असून,  घटना घडल्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. उपरोक्त बाबींच्या छायाचित्रणासोबतच प्रोसेडिंग बुकमध्ये नोंद असल्याचा सत्ताधार्‍यांचा दावा आहे. त्यामुळे विरोधकांचे उत्तर असंयुक्तिक आणि तथ्यहीन असल्याचे सत्ताधार्‍यांचे म्हणणे आहे. एकमेकांना ‘खोटे’ ठरविण्यासाठी सत्ताधारी  आणि विरोधकांमध्ये जुंपली असून, या राजकीय युद्धात कोण बाजी मारते, याकडे आता जनतेच्या नजरा लागल्या आहेत.   

‘ठरावा’च्या हालचाली!काँग्रेस नगरसेवकांच्या सभेतील गैरवर्तणुकीबाबत खामगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी काँग्रेस नगरसेवकांना महाराष्ट्र नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (१) अन्वये गैरवर्तणुकीबाबत शासनाकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव का पाठविण्यात येऊ नये, अशी नोटीस महाराष्ट्र नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (३) अन्वये नोटीस बजावली होती. या नोटीसचे उत्तर १0 फेब्रुवारीपर्यंत मागितले होते. दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांनी नगराध्यक्षांना दिलेले उत्तर जिव्हारी लागल्याने सत्ताधार्‍यांनी काँग्रेस नगरसेवकांच्या अपात्रतेच्या ठरावासाठी हालचाली चालविल्या असल्याचा सूत्रांचा दावा आहे. यासंदर्भात येत्या आठवड्यात पालिकेची विशेष सभाही बोलाविण्यात येणार असल्याचे समजते. 

काँग्रेस नगरसेवकांच्या सभेतील गैरवर्तनाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांना कायदेशीर आणि घटनेला धरुन नोटीस देण्यात आली. बदनामीच्या भीतीने त्यांनी घटना घडली नाही, असे उत्तर दिले आहे. - अनिता डवरे,नगराध्यक्ष, खामगाव

सत्ताधार्‍यांच्या गैरकारभाराला आळा घालणे, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बाधा पोहोचविणार्‍या विषयांचा विरोध करणे हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. पालिकेत बहुमत असल्याने कोणत्याही गोष्टीचे भांडवल करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे सत्ताधार्‍यांचे प्रयत्न आहेत. खामगाव पालिकेत विरोधकांना बाजू मांडायलादेखील संधी नाही. याबाबत वेळ पडल्यास कायदेशीर लढा दिल्या जाईल.- अर्चना टाले, गटनेत्या, काँग्रेस, न.प. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव