शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटी रुपयांच्या निधीवरून खामगाव पालिकेत राजकीय घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:30 IST

Khamgaon Municipal Counsil शहरातील विकास कामांना खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याची ओरड पालिकेतील सत्ताधा-यांकडून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेंतर्गत शासनाकडून दिल्या जाणा-या ५ कोटी रुपयांच्या निधीवरून खामगाव पालिकेत राजकीय घमासान सुरू आहे. पालिकेतील सत्ताधा-यांवर राजकीय कुरघोडीत राष्ट्रवादीचे नगरसेवक भारी ठरल्याची जोरदार चर्चा असतानाच, शहरातील विकास कामांना खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याची ओरड पालिकेतील सत्ताधा-यांकडून होत आहे.राष्ट्रवादीचे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंर्गत प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकास कामांसाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकास कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच उपरोक्त कामांना  महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी महेंद्र दळवी यांच्या स्वाक्षरीने २ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. परिणामी, सत्ताधा-यांनी शहराच्या विविध प्रभागात सुचविलेली प्रस्तावित कामे अडचणीत आली आहेत.  राजकीय शह-काटशहाच्या राजकारणामुळे खामगाव पालिकेत ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राजकीय घमासान सुरू झाल्याचे दिसून येते.

सत्ताधाऱ्यांचा निषेधावर भर!   खामगाव नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर  कुरघोडी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी आपल्या प्रभागात ५ कोटींचा निधी खेचून आणला.   त्यामुळे सत्ताधा-यांकडून नगरसेवक देशमुख विकासकामात खीळ घालत असल्याची ओरड होत आहे.

शासनाविरोधात सत्ताधारी उच्च न्यायालयात!   शहरातील विविध प्रभागात प्रस्तावित केलेली ५ कोटींच्या कामांना कात्री लागली. ही बाब खामगाव पालिकेतील सत्ताधा-यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय.   त्यामुळे या संपूर्ण प्रकाराविरोधात नगर पालिकेच्या ‘कारभारी दादा’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यासाठी दंड थोपटले आहे.

खामगाव पालिकेतील सत्ताधा-यांकडून गत चार वर्षांत विरोधी नगरसेवकांवर सातत्याने अन्याय करण्यात आला. विकास निधीचे वितरण करताना स्वपक्षीय नगरसेवक आणि सत्ताधा-यांच्या प्रभागातील कामे करण्यात आलीत. अन्याय सहन न झाल्यामुळे शासनदरबारी रेटा देत ५ कोटींचा विकासनिधी प्रभागासाठी खेचून आणला.- देवेंद्र देशमुखनगरसेवक, खामगाव. 

एका प्रभागासाठी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करणे, म्हणजे शहरातील इतर प्रभागांवर अन्याय करण्यासारखे आहे.  यामुळे शहर विकासासाठी चुकीचा पायंडा पडण्यास मदत होईल. देवेंद्र देशमुख आणि शासनाचे हे कृत्य निषेधार्ह आहे. - संजय मुन्ना पुरवार उपाध्यक्ष, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावPoliticsराजकारण