शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

लोणारात पोलिसांचा जुगाराव छापा; ३३ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 11:08 IST

Police raid on gambling at Lonar : स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमध्ये जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती आहे. 

बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेने लोणार येथील एका घरात छापा मारून जुगार खेळणाऱ्या ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून मोबाईल, दुचाकी, चारचाकी वाहनांसह रोख रक्कम असा एकूण २८ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमध्ये जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती आहे. या कारवाईत पोलिसांनी संतोष लध्दड (रा. हिवरा आश्रम), अनिल इंगळे (मेहकर), सुधीर गवई (चिखली), एकनाथ गायकवाड (ब्राम्हण चिकना), सुनील सुर्जन (मेहकर), शेख शेखावत (लोणार), शेठ मिस्कीन (लोणार), फारूख खा (खामगाव), जितेंद्र राऊत (चिखली), दत्तात्रय मोगल (सेलू, जि. जालना), अब्दुल अनिस (मेहकर), शरद भानापुरे (सुलतानपूर), शेख राजू (खामगाव), शांताराम जाधव (भीवगाव), इम्रान खान (लोणार), विलास म्हस्के (सोनोशी), अलियारखान (लोणार), राजेंद्र जैन (चिखली), भगवान आघाव (सोनोशी), सागर अंभोरे (नांदुरा) संतोष डोईफोडे (सि. जहाँगीर), विश्वनाथ कुंटला (अहमदनगर), अस्लमखान (लोणार), रामेश्वर मालवणकर (लोणार), शेख तौफिक (लोणार) विठ्ठल आकात (सेलू, जि. जालना), इम्रानखान (लोणार) अब्दूल रफीक (चिखली), गजानन वर्षे (ब्रम्हपुरी), ज्ञानेश्वर खानझोडे (खामगाव), रविराज चव्हाण (लोणार), सुनील साळवे (चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी राजू मापारी (रा. लोणार) हा फरार झाला आहे. त्याच्या राहत्या घरात हा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे या ठिकाणी २४ मे रोजी रात्री छापा टाकण्यात आला हाेता. या कारवाईत नगदी दोन लाख ४५ हजार रुपये, २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाईल, तीन लाख ७० हजार रुपयांच्या सात दुचाकी, २० लाख रुपयांची चारचाकी वाहने असा एकूण २८ लाख ८४ हजार ५७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी लोणार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिनाभरापासून सुरू होता जुगारराजू मापारी याच्या निवासस्थानी महिनाभरापासून हा जुगार सुरू असल्याची लोणारमध्ये चर्चा आहे. कारवाईदरम्यान तो फरार झाला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. तोही राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त जालना, अहमदनगरसह, खामगाव, चिखली, लोणारसह अन्य शहरातील व्यक्ती या ठिकाणी जुगार खेळण्यास येत होते. 

टॅग्स :LonarलोणारCrime Newsगुन्हेगारी