शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

पोलिसांनी मारहाण केल्यानेच मृत्यू !

By admin | Updated: November 17, 2014 00:40 IST

चाँदशाह मृत्यूप्रकरण : नातेवाइकांचा आरोप.

शेगाव (बुलडाणा) : पोलिसांच्या ताब्यातील आरोपीच्या मृत्यूप्रकरणाने आता वेगळीच कलाटणी घेतली असून, आरोपींसह पोलिसांनी मारहाण केल्याने चाँदशाह यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. अमिरशाह आणि इकरारखाँ यांच्यातील दोन गटांमध्ये शौचालय बांधण्याच्या कारणावरून ५ नोव्हेंबर रोजी वाद निर्माण होऊन हाणामारी झाली होती. यामध्ये दोन्ही गटांतील तीन जण जखमी झाल्यानंतर शेगाव पोलीसांनी दोन्ही गटांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. यामध्ये शाह गटातील चार जणांना ७ नोव्हेंबर रोजी अटक करून शेगाव न्यायालयासमोर हजर केले. आरोपींमधील चाँदशाह सुभानशाह (६५) यांची प्रकृती खालावल्याने न्यायालयाने सुनावणी सुरू असताना आरोपीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला प्रथम शेगाव येथील एका खासगी रुग्णालयात व त्यानंतर अकोला येथे हलविले. चाँदशाह यांचा ११ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याशिवाय पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यू झाल्याने सीआयडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यादरम्यान आरोपीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी यवतमाळ येथे करण्यात आली. उत्तरीय तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, आज रविवारी मृतक चाँदशाह यांचे नातेवाईक अमीरशाह महमूदशाह, हाजी अतिकशाह, जावेदशाह आदींनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. इकरारखाँ यांनी पैशांच्या जोरावर सहायक पोलिस निरीक्षक तावडे यांना ह्यमॅनेजह्ण केले आणि चाँदशाह यांना पोलिस कस्टडीत जबर मारहाण करण्यात आली. धमक्या दिल्याने ते मरण पावले., असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.