शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तासाठी पोलिसांची दुहेरी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:02 IST

निवडणूक आणि नवरात्रोत्सव अशी दुहेरी कसरत सध्या पोलिसांची सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. परंतू निवडणुकीबरोबरच पोलिसांवर नवरात्रोत्सवातील बंदोबस्ताचाही ताण वाढला आहे. त्यामुळे निवडणूक आणि नवरात्रोत्सव अशी दुहेरी कसरत सध्या पोलिसांची सुरू आहे.सण, उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येतो. शहरासह ग्रामीण भागात शांतता राखण्यासाठी पोलीस तैनात केले जातात. रविवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून समोर दसरा व त्यातच निवडणुकीचीही धामधूम सुरू आहे. नवरात्री व दसऱ्याच्या काळात भाविकांची सर्वत्र गर्दी असते. शहरातील विविध चौकात व ग्रामीण भागातही आदिशक्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. विविध पुरातन मंदिरांमध्ये नवरात्रीनिमित्त घटस्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या ठिकाणी प्रत्येक दिवशी भाविकांची गर्दी वाढते. जिल्हाभर नवरात्रोत्सव आणि दसºयानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अमरावती येथून राज्य राखीव दलाचे १०० जवान तैनात करण्यात आले आहे. खामगाव येथे त्यांचे मुख्यालय आहे. या जवानांचे प्रत्येकी एक प्लाटून मलकापूर, खामगाव व चिखली येथे कार्यरत राहणार आहे. एका प्लाटूनमध्ये ३० ते ३५ जवानांचा समावेश आहे. त्यात विधानसभा निवडणूक असल्याने पोलिसांचे दडपण वाढले आहे. निवडणूक आणि नवरात्रोत्स यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणाºया पोलिसांची दमछाक होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस