शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेच्या ‘पीएमसी’चे काम अर्ध्यावर सोडता येणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 15:11 IST

पाणी पुरवठा योजनेचे काम अर्ध्यावर सोडता येणार नसल्याचे खामगाव नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला स्पष्ट केले आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने असहमती दर्शविली आहे. यासंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहारही मजीप्राकडून करण्यात आला आहे. मात्र, खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अर्ध्यावर सोडता येणार नसल्याचे खामगाव नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला स्पष्ट केले आहे. पत्रव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि पालिकेत जुंपल्याचे दिसून येते.युआयडीएसएसएमटी योजनेतंर्गत खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणची शासनस्तरावरून नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने खामगाव नगर पालिकेशी २९ मार्च २०१७ रोजी करारनामा देखील केला आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यासाठी ५६ लक्ष २५ हजार रुपयांचा भरणा नगर पालिकेकडून २५ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आला. दरम्यान, आता खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामध्ये चांगलीच जुंपली आहे.खामगाव शहरासाठी महत्वाकांक्षी असलेली वाढीव पाणी पुरवठा योजना रखडल्याने तसेच योजनेचे काम अपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या ‘पीएमएसी’चे काम सोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.मजीप्रा आणि पालिकेमध्ये बैठकांचे सत्र !मजीप्राने ‘पीएमसी’म्हणून काम करण्यास नकार देत, पत्रव्यवहार केल्यानंतर पालिकेनेही महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाशी पत्रव्यवहार चालविला आहे. तसेच वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम विहित मुदतीत वाढीस लागावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि नगर पालिकेमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे दिसून येते.

योजनेची अनेक कामे अर्धवट!खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेची सद्यस्थितीत उर्ध्ववाहिनी, जॅकवेल आणि पंपहाऊसचे काम, गुरूत्ववाहिनी आणि विद्युत जोडणीची काही कामे अपूर्ण आहेत. वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करण्याबाबत शासनस्तरावरनू निर्देशीत केले आहे. मात्र, आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या भूमिकेमुळे वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये आणखी तिढा निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा