शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

PM Kissan Scheme : रक्कम परतीच्या नोटिसीला जिल्ह्यातील ५,८७० करदात्या शेतकऱ्यांनी दाखविला ठेंगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:10 IST

PM Kissan Scheme : जवळपास ६ हजार ७११ करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पंतप्रधान किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये देण्यात येतात. मात्र, यामध्ये गेल्या वर्षी काही करदात्या शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा करदात्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम परत घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. जवळपास ६ हजार ७११ करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यांच्यापैकी ५ हजार ८७० शेतकऱ्यांनी अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे या अशा करदात्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सध्या प्रयत्नरत आहे.गेल्या वर्षी या योजनेसाठी जिल्ह्यातील तीन लाख ८९ हजार शेतकरी पात्र होते. त्यांना हे अनुदान देण्यात आले होते. मात्र, त्यात काही करदात्या शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पडताळणी केल्यानंतर निव्वळ शेतकरी म्हणून तीन लाख ८२ हजार ६०७ जण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे उर्वरित ६ हजार ७११ जणांना तहसील कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली होती. त्यापैकी ८४१ शेतकऱ्यांनी त्यांना योजनेंतर्गत मिळालेले ७५ लाख ८६ हजार रुपये परत केले आहेत. अद्यापही ५ हजार ८७० करदात्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत घेणे बाकी आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत.

आतापर्यंत ७५ लाख ८६ हजार वसूलजिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ७५ हजार ८६ लाख रुपये अशा करदात्या शेतकऱ्यांकडून वसूल केले आहेत. यामध्ये अनेक जण हे नोकरीवर असून, त्यांच्या नावावर शेती असल्याने त्यांना हा लाभ दिल्या गेला होता. आयकर विभागाच्या तपासणीत ही बाब उघड झाल्याने सार्वत्रिक स्वरूपात अशा करदात्या शेतकऱ्यांकडून देण्यात आलेली अनुषंगिक रक्कम वसूल करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. जिल्ह्यातील अशा करदात्या शेतकऱ्यांना जवळपास ५ कोटी ८१ लाख ९८ हजार रुपये योजनेंतर्गत देण्यात आले होते. ते आता परत घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना