शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचे ‘सीड बॉल’च्या माध्यमातून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:53 IST

ईरा किड्स स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘सीड बॉल’ तयार केले असून या चिमुकल्यांनी तयार केलेल्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाच्यावतीने ३३ कोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक कार्यकर्ते संस्था, संघटनांच्या माध्यमातून खुल्या जागांवर, डोंगरांवर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जात आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा राहावा, या हेतूने स्थानिक ईरा किड्स स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘सीड बॉल’ तयार केले असून या चिमुकल्यांनी तयार केलेल्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येत आहे.यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून येथील डॉ. युवराज व डॉ. सायली सिरसाट या डॉक्टर दाम्पत्याच्या संकल्पनेतून ‘सीड्स बॉल’ ही संकल्पना पुढे येत आहे. या सीड्स बॉलची उपयोगीता पाहता स्थानिक ईरा किडस् स्कूलच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. हे सीड बॉल बनविणे सोपे असल्याने यात शाळेतील चिमुकल्यानी उत्साहात सहभाग नोंदविला. मानवाच्या विकासाच्या हव्यासापोटी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून विविध प्राकृतिक आपदांना तोंड द्यावे लागत आहे. यावर वृक्षलागवड करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याने ईरा किड्स या शाळेतील विद्यार्थ्यांनी सिड बॉल ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवून चारशेहून अधिक सिड बॉल तयार केले होते. यासाठी शेणखत व काळ्या मातीचे मिश्रण करून यांचे लहान गोळे तयार करून या मातीच्या गोळ्यात विविध वृक्षाच्या बिया भरून हे गोळे व्यविस्थतरित्या सुकविल्यानंतर तालुक्यातील माळशेंबा-भडगांव रस्त्यावर व परिसरातील मोकळ्या वनजमीनीवर चिमुकल्या हातांनी टकाले आहेत. यामाध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवाचा कृतीशील संदेश दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentपर्यावरण